सोनोग्राफी या उपकरणाचा वापर आजारांचे निदान करण्यासाठी केले जाते. परंतु गेल्या काही काळापासुन सोनोग्राफीमधील अल्ट्रासाऊंड लहरींचा वापर स्त्रियांच्या गर्भाशयाची तपासणी करण्यासाठी केला जात आहे. अशीच एक तपासणी सुरु असताना डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण तपासणी दरम्यान एका महिलेच्या गर्भात दोन जुळी मुलं चक्क एकमेकांशी भांडण करताना दिसली आहेत. चीनमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर सध्या व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ चिनमधील यिनचुआन शहरातील एका लहानशा दवाखान्यात एक वर्षांपुर्वी रेकॉर्ड केला गेला होता. त्या महिलेची प्रसूती झाल्यानंतर या व्हिडीओला इंटरनेवर अपलोड केले गेले. व्हिडीओमध्ये दिसणारी महिला चार महिन्यांची गर्भवती होती. तिच्या गर्भात जुळ्या मुली होत्या. त्या मुलींची नावे चेरी आणि स्ट्रॉबेरी असे ठेवण्यात आले आहे. हा व्हिडीओ २.५ दशलक्ष लोकांनी पाहिला असुन त्यावर ८० हजारांपेक्षा जास्त लोकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत.

सोनोग्राफी म्हणजे काय?

सोनोग्राफी तपासामध्ये अल्ट्रासाऊंडचा (ध्वनीलहरी) वापर केला जातो. या तंत्रज्ञानाचा वापर मुख्यत्वे पोटातील व स्त्रियांच्या गर्भाशयाची तपासणी करण्यासाठी केला जातो. या तंत्रज्ञानाव्दारे शरिरात सोडल्या जाणाऱ्या ध्वनिलहरी या क्ष किरणांपेक्षाही सौम्य असतात. त्यामुळे गर्भवती महिलांच्या गर्भाला कोणताही प्रकारचा धोका पोहोचत नाही. तसेच गर्भाची वाढ, गर्भाचे रोग, गर्भधारणा यांचा पूर्ण अभ्यास कितीही वेळा करता येऊ शकतो.