मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी संसदेत सादर केला. खरं तर या अर्थसंकल्पाकडून मध्यमवर्गीय नोकरदार वर्गांच्या जास्त अपेक्षा होत्या. पण, नेहमीप्रमाणे अपेक्षांवर पाणी पडल्याच्या भावना बजेट सादर झाल्यानंतर मध्यम वर्गाकडून सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात वैयक्तिक कररचनेत कोणताही बदल केलेला नाही तर दुसरीकडे परदेशातून आयात केलेल्या वस्तूंवर कस्टम ड्युटीत भरघोस वाढ केल्यानं हा अर्थसंकल्प सामान्यांना फारसा भावलेला दिसला नाही. म्हणून की काय जेटलींचा अर्थसंकल्प संसदेत सादर होताना ट्विटरवर मात्र ट्विपल्स ‘हास्यसंकल्प’ सादर करत होते. त्यामुळे ट्विटरवर विनोदांचा हा हास्यसंकल्प ट्रेंडमध्ये आलेला दिसून येत होता.

तुलनेनं समजायला थोडासा अवघड असलेला हा अर्थसंकल्प सामान्य लोकांनी आपली डोकॅलिटी वापरून कसा समजून दाखवला हे तुम्हीच पाहा.