News Flash

‘स्वच्छ भारत अभियान’ फारच गंभीरतेने घेतलंय, मग काय प्रियांकावर चर्चा तर होणारच!

सबे को सोनी लगदी देसी गर्ल

(छाया सौजन्य : AFP)

ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप, वेबसाईट्स, चॅनेल काय म्हणून विचारू नका.. जिथे तिथे फक्त आणि फक्त ‘देसी गर्ल’ची चर्चा. आता चर्चेत यायला काय झालंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मग तिचे मेट गाला रेड कार्पेटवरचे फोटो पाहाच. आता हे वाचेपर्यंत तुम्हीची तिचे फोटो शोधून काढलेही असतील. हो ना! तर सांगायचा मुद्दा असा की प्रियांका चोप्राच्या ड्रेसची सकाळपासूनच जोरदार चर्चा सोशल मीडियावर होते आहे. आता ही चर्चा ऐकून
‘रुकू जरा मैं जो यहाँ
थंडी थंडी सारी साँसे थम जाये
सबकी निगाहो ने है काहाँ
की खाँबो मै ही देखी मेरी जैसी गर्ल
देखी लख लख परदेसी गर्ल
सबे को सोनी लगदी देसी गर्ल ‘
या ओळी तिच्या ओठी आल्या नसतील तर नवलचं.

रेड कार्पेटवर दमदार एण्ट्री मारलेल्या प्रियांकाने आपल्या स्टाईलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ‘राल्फ लॉरेनच्या’ ट्रेन्च कोट गाऊन घालून प्रियांकाने रेड कार्पेटवर एण्ट्री घेतली आणि बस्स रे बस्स.. सगळेच त्या अप्सरेला पाहातच बसले. ती एवढी सुंदर दिसते म्हणजे चर्चा तर होणारच ना! तिची स्टाईल आणि गाऊन पाहून जगभरातल्या फॅशनप्रेमींकडून कौतुक होत आहे. तसं भारतीयांनीही तिच्या फॅशन सेन्सचं कौतुक केलंय म्हणा पण तिच्या फॅशन सेन्सचं कौतुक करता करता आपल्या इथल्या नेटिझन्सचाही ‘सेन्स ऑफ ह्युमर’ जागा झालाय. तेव्हा तिच्या स्टाईलचे कौतुक करण्यापेक्षा विनोदच जास्त पाहायला मिळत आहे आहे. कोण म्हणतंय प्रियांकाने स्वच्छ भारत अभियान गंभीरतेने घेतंलय तर कोण म्हणतंय आपातकालीन स्थितीसाठी ती पॅराशूट पाठीवर घेऊन फिरतेय. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले इतर ट्विट पाहूनच त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर किती चालतोय हे तुम्हीच पाहा. काय माहिती हे ट्विट वाचून तुम्हालाही एखादा दुसरा विनोद सुचेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 1:15 pm

Web Title: twitter got jokes on priyanka chopra met gala red carpet dress
Next Stories
1 बिल गेट्स यांची रिक्षाने भारत भ्रमंती!
2 साडी नेसून ‘ती’ अमेरिकी महिला करतेय ट्रम्पना विरोध
3 वयाच्या १४६ वर्षी जगातील सगळ्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Just Now!
X