News Flash

#IndependenceDayIndia : ‘स्वातंत्र्य दिना’निमित्त ट्विटर इंडियाचा मराठीतूनही हॅशटॅग

देशभरातील काही निवडक भाषांमध्ये 'स्वातंत्र्य दिना'चे खास हॅशटॅग तयार करण्यात आले आहेत. हे हॅशटॅग वापरून तुम्ही मातृभाषेत ट्विटरवर शुभेच्छा देऊ शकता.

ट्विटरनं मराठी, इंग्रजीसह, हिंदी, गुजराती, तमिळ अशा अनेक भाषांत हॅशटॅग तयार केले आहेत.

७२व्या स्वांतत्र दिनानिमित्त ट्विटर इंडियानं खास हॅशटॅग तयार केला आहे. ट्विटर इंडियाच्या अधिकृत अकाऊंटवरून या खास हॅशटॅगसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. देशभरातील काही निवडक भाषांमध्ये ‘स्वातंत्र्य दिना’चे वेगळे हॅशटॅग तयार करण्यात आले आहेत. यात मराठी भाषेतील हॅशटॅगचाही समावेश आहे.

आजच्या दिवशी ट्विटरवर मोठ्या प्रमाणात #IndependenceDay, #स्वातंत्र्यदिन यांसारखे हॅशटॅग वापरून देशवासीय शुभेच्छा देतात. त्यामुळे ट्विटरनं मराठी, इंग्रजीसह, हिंदी, गुजराती, तमिळ अशा अनेक भाषांत हॅशटॅग तयार केले आहे. हे हॅशटॅग ट्विटरवर टाईप केल्यास त्यापुढे लाल किल्ल्याचा इमोजीदेखील दिसणार आहे. दरवर्षी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं जातं. त्यामुळे लाल किल्ल्याला या इमोजीमध्ये विशेष स्थान देण्यात आलं आहे.

ट्विटर इंडिया भारतातील काही महत्त्वाच्या प्रसंगी किंवा सणवारी अशा प्रकारचे इमोजी असलेले खास हॅशटॅग तयार करतात. २०१६ मध्ये ट्विट इंडियानं गणेश चतुर्थीनिमित्तानं खास मराठीत वेगवेगळे हॅशटॅग तयार करत अनेकांचं मन जिंकलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 8:22 am

Web Title: twitter india special hashtags on independence day 2018
Next Stories
1 पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी शुभेच्छा देणाऱ्या ट्विटरकराला सानिया मिर्झाचं सडेतोड उत्तर
2 जपानमधील ‘या’ शहराचे नाव ठेवले हिंदू देवतेवरून
3 मेगनचा आवडता पदार्थ शाही कुटुंबाच्या स्वयंपाक घरातून हद्दपार
Just Now!
X