News Flash

ट्विटरवर हे हॅशटॅग वापरल्यास अवतरतील गणराय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले ट्विटर इंडियाचे आभार

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाचे घरोघरी आगमन झाले आहे. त्याच्या आगमनाने वातावरण आनंदित झाले.  घराघरात सुख घेऊन आलेल्या या देवाने नेटीझन्ससाठी देखील एक खुशखबर आणली आहे. गणपतीच्या काळात बाप्पांचे फोटो अनेक जण सोशल मीडियावर अपलोड करतात आणि त्याचबरोबर वेगवेगळे हॅशटॅग वापरून आपल्या बाप्पांचे वर्णन अनेक जण करतात. हेच लक्षात घेऊन ट्विटर इंडियाने यावर्षीपासून नवा प्रयोग केला आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी ट्विटर इंडियाने याची अधिकृत घोषणा केली होती. त्यामुळे आता गणेश चतुर्थीनिमित्त वापरण्यात आलेल्या विविध हॅशटॅगच्या नंतर बाप्पाच्या रुपातले इमोजी दिसणार आहेत. #Ganesh #Ganeshotsav #GaneshChaturthi  #Ganapati #Ganesha #गणपति #गणेश #गणेशचतुर्थी #गणेशोत्सव यांसारख्या हॅशटॅगनंतर बाप्पांचे इमोजी दिसणार आहे.
आपल्या भारतीय युजर्सना खूष करण्यासाठी ट्विटरने हा प्रयोग केला आहे. याआधी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, दिवाळी यावेळी इमोजी असलेले हॅशटॅग ट्विटर इंडियाने आणले होते. पण पहिल्यांदाच ट्विटरने एकाहून अधिक हॅशटॅगमध्ये बाप्पांचे इमोजी आणले आहे. विशेष म्हणजे फक्त इंग्रजीत नाही तर मराठी हॅशटॅशचा देखील यात समावेश करण्यात आला आहे. ट्विटर इंडियाच्या या प्रयोगामुळे नेटीझन्स तर खुश आहेत पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट करून ट्विटर इंडियाचे आभार मानले आहे. त्यामुळे सकाळपासून ट्विटरवर बाप्पांचे आगमन ट्रेंडिगमध्ये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 3:58 pm

Web Title: twitter launches special emoji for ganesh chaturthi
Next Stories
1 VIDEO: त्या पोलीस अधिकाऱ्याने स्वत:वरच केली ‘टेसर गन’ची चाचणी
2 Viral Video : अरे देवा ! बॅगेसोबत ‘तो’ ही स्कॅनिंग मशीनमध्ये शिरला
3 शिक्षक दिन का साजरा करतात; सोशल मिडीयावर प्रश्नांचा पाऊस
Just Now!
X