सध्याच्या ऑनलाइन जगात सोशल मीडियावर रोज एखादा नवा ट्रेंड सुरु असतो. कोणच्या बाजूने तर कधी कोणाच्या विरोधात हा ट्रेंड असतो. बॉलिवूड सेलिब्रेटी तसंच तनिष्कच्या निमित्ताने सध्या बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरु आहे. काही दिवसांपूर्वी तनिष्कच्या जाहिरातीवरन वाद झाल्यानंतर आता एरॉस नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. ट्विटरवर सध्या #BoycottErosNow हा ट्रेंड सुरु आहे. एरॉसकडून सोशल मीडियावर नवरात्रीनिमित्त शेअर करण्यात आलेल्या काही पोस्टवरुन हा वाद निर्माण झाला आहे.

एरॉसने काय पोस्ट शेअर केल्या आहेत ?
शनिवारपासून नवरात्र सणाला सुरुवात झाली असून तेव्हापासून एरॉस आपल्या कंपनीकडून निर्मित चित्रपटांमधील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहे. यामध्ये दीपिका पदुकोनचा ‘बाजीराव मस्तानी’मधील तर करिना कपूरचा Ra.One चित्रपटातील फोटोंचा समावेश आहे. पण यावेळी कंपनीने कतरिनाचा पिवळ्या साडीतील फोटो शेअर करताना लिहिलेल्या पोस्टवरुन हा वाद सुरु झाला आहे.

याशिवाय सोनाक्षी सिन्हा, कंगना आणि ऐश्वर्या यांचेही फोटो शेअर करण्यात आले आहेत. नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवसासाठी वेगवेगळ्या रंगाचं महत्व असून एरॉस सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रेटींचे फोटो, व्हिडीओ शेअर करत फॅशन टिप्स देण्याचा प्रयत्न करत आहे.
कोणत्या पोस्ट केले आहेत हे पहा –


मात्र यावेळी त्यांनी कतरिनाचा फोटो शेअर करताना केलेला उल्लेख नेटकऱ्यांना खटकला आहे. फोटोमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “”Do you want to put the ‘ratri’ in my Navratri?”.

#BoycottErosNow ट्रेंड का होत आहे ?
एरॉसच्या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत ट्विटरला #BoycottErosNow ट्रेंड सुरु केला आहे. हिंदू सणांसंबंधी अशा पद्धतीने आक्षेपार्ह उल्लेख केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

#BoycottErosNow ट्रेंड सुरु कसा झाला ?
भाजपाचे हरियाणामधील सोशल मीडिया प्रमुख अरुण यादव यांनी ट्विटरला एरॉसविरोधात पोस्ट केल्यानतंर हा ट्रेंड सुरु झाल्याचं दिसत आहे. अरुण यादव यांनी ट्विटरला दोन फोटो शेअर करत एरॉसकडून केला जाणारा भेदभाव दाखवला आहे. या पोस्टमध्ये एका फोटोत नवरात्रीनिमित्त कतरिना पिवळ्या साडीत दाखवली असून दुसऱ्या फोटोत एरॉस ईदच्या शुभेच्छा देताना आहे.

अभिनेत्री कंगनानेही ट्विट करत याप्रकरणी निषेध व्यक्त केला आहे.

एरॉसकडून निवदेन प्रसिद्ध
नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर एरॉसकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

“आम्ही सर्व संस्कृतींवर प्रेम आणि आदर करतो. कोणाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता आणि आहे. आम्ही संबंधित पोस्ट डिलीट केल्या असून माफी मागत आहोत,” असं एरॉसने म्हटलं आहे.