भारतातील हिंदी मालिका म्हटल्यावर त्यामध्ये ट्विस्ट किंवा अगदी भन्नाट वळण घेणारे कथानक हे आलेच. म्हणजे अगदी जुन्या मालिकांपासून ते आताच्या मालिकांपर्यंत आपल्याला असे अनेक किस्से आणि गोष्टी ठाऊक आहेत ज्यामुळे लोकप्रिय मालिकांच्या टीआरपीने अगळी उसळी खाल्ली किंवा मालिका बंद पडण्यासाठी तो ट्विस्टच कारणीभूत ठरला. करोनामुळे अनेक महिन्यांपासून बंद असणारे मालिकांचे चित्रिकरण पुन्हा सुरु झाले आहे. मात्र आता याच करोनाचा संदर्भ थेट मालिकांच्या कथानकात दिसू लागला आहे. ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेमधील काही दृष्य सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत असून या मालिकेत ज्या पद्धतीने करोनाची पार्श्वभूमी वापरण्यात आली आहे त्यावरुन निर्माते आणि कलाकारही ट्रोल होत आहेत.

काय आहे या दृष्यांमध्ये

व्हायरल झालेल्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेमधील एका दृष्यामध्ये प्रमुख अभिनेता कार्तिक का नायराला बाहेर जाण्याआधी करोनापासून वाचण्यासाठी सर्व तयारी करुन देताना दाखवण्यात आलं आहे. यामध्ये अगदी हातावर सॅनिटायझर देण्यापासून ते तोंडावर शिल्ड मास्क लावण्यापर्यंतची तयारी तो नायराला करुन देतो. पुढच्याच दृष्यात कार्तिक नायराकडे आकर्षित होऊन तिने फेस शिल्ड लावलेली असतानाच तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करताना दाखवण्यात आलं आहे. हे दृष्य सध्या ट्विटवर व्हायरल होत आहे. त्यावर अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे पाहा ते दृष्य

आश्चर्याची बाब म्हणजे या व्हिडिओला ट्विटवर १० हजारच्या आसपास व्ह्यूज मिळाले आहेत.

तर दुसऱ्या एका दृष्यामध्ये पुजेचं ताट घेऊन जाणारी सासू शिल्ड मास्क लावून घराबाहेरुन आलेल्या नायराकडे पाहताना तोंडावरचे मास्क काढून हावभाव देताना दाखवण्यात आली आहे.

या व्हिडिओला एक लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. तर २३ हजारहून अधिक जणांनी तो रिट्विट केला आहे. या दोन्ही व्हिडिओमुंळे नेटकऱ्यांनी भारतीय आयांना आवडणाऱ्या या टीपीकल फिल्मी स्टाइलच्या मालिकांवरुन काही मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाहुयात काय आहे त्यांचे म्हणणे

वैज्ञानिकांनी संशोधन सुरु केलं

आई म्हणत असेल आता मज्जा येणार…

करोना काळातही काम करणाऱ्या कलाकारांसाठी…

हस्यास्पद

करोनाही यांना थांबवू शकला नाही

करोना म्हणत असेल…

मास्क काढणे म्हणजे…

आई हे बंद कर असं म्हणाल्यावर आई म्हणते…

आईकडून रिमोट घेणे

वा काय अभिनय केलाय

पुढच्या भागात पीपीई

एकंदरीतच नेटकऱ्यांना हा करोना ट्विस्ट फारकाही तर्कबुद्धीला धरुन असल्यासारखे वाटलेले नाही असं चित्र दिसत आहे. तुम्हाला काय वाटलं ही दोन्ही दृष्य बघून कमेंट करुन नक्की कळवा.