भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा सहज पराभव करत आशियाई चषक स्पर्धेमध्ये सलग दोन दिवसांमध्ये दुसऱ्या विजयाची नोंद केली. हाँगकाँग सारख्या नवख्या संघासमोर गोंधळलेल्या भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळताना संपूर्ण सामन्यामध्ये आपले वर्चस्व कायम ठेवत हा विजय साकारला. अर्थात या विजयाला भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर मोठे महत्व होते. म्हणूनच हा विजय नेटकऱ्यांनी एकदम दण्यात साजरा केला आहे. तसा पाकिस्तानविरुद्धाचा कोणत्याही खेळातील विजय भारतीय नेटकरी दण्यातच साजरा करतात मात्र क्रिकेट हा जरा जास्त जिव्हाळ्याचा विषय असल्याने चर्चा तर झालीच आणि त्यात पाकिस्तानची खिल्लीही उडवली गेली. पाहुयात भारताच्या विजयानंतर कशाप्रकारे नेटकऱ्यांनी पाकिस्तानी संघाला लक्ष्य केले आहे.

भारताविरुद्धचा पराभव पाकिस्तानमधील पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला

लय हाणलं रावं

बेटा तुम से ना हो पाऐगा

सामन्यानंतर पाकिस्तानमधील टिव्हींची सुरक्षा वाढवली

यांच्यापेक्षा हाँगकाँग बरा होता

पाकिस्तानने हे करायला हवं का?

त्यांच्यापेक्षा यांच्याबरोबर छान खेळले

आम्ही हार्दिकसाठी तयारी केली आणि केदार जाधव हा अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नासारखा आला

काय रटाळ सामना होता राव

दोन धावांने जिंकला आहे भारत

कालचा गोंधळ बरा होता

एवढ्या पटापट तंबूत गेले ते

…म्हणून पाकिस्तानने चांगला खेळ केला नाही

२०९९ साली असंच असेल…

चला २०१७ची चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल बघू

बाप बाप असतो

प्रत्येक पराभवानंतर