29 September 2020

News Flash

लागली पैज?… ‘या’ फोटोत मांजर शोधताना भले भले थकले; तुम्हाला सापडतेय का पाहा बरं

तुमचा विश्वास बसणार नाही पण या फोटोवर आहेत तब्बल साडेबारा हजार कमेंट

Photo: twitter/katehinds

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. अनेकदा वेगवेगळी कोडीही सोशल मिडियावर व्हायरल होतात आणि मग त्याचे उत्तर शोधण्यासाठी नेटीझन्समध्ये एकच स्पर्धा लागते. काहीवेळा यामध्ये वाळलेल्या पानांतील साप शोधायला सांगितलेला असतो, तर काही वेळा आणखी काही. सध्या लॉकडाउनमुळे अनेक जण घरीच असल्याने सोशल नेटवर्कींगवर चॅलेंजचेही पेव फुटल्याचे चित्र दिसत आहे. मात्र एका चॅलेंजची सोशल नेटवर्किंगवर चांगलीच चर्चा आहे. ते चॅलेंज म्हणजे फोटोमध्ये मांजर शोधून दाखवण्याची.

केट हिंड्स या महिला पत्रकाराने ट्विटरवर पोस्ट केलला फोटो सध्या चांगलाच चर्चेत आहे. केटने १० वर्षांपूर्वी प्राणी मित्रांकडून एक मांजर दत्तक घेतली होती. या मांजरीला तिने नोआ असं नाव दिलं होतं. याच मांजरीचा एका पुस्तकांच्या कपाटामध्ये लपलेला फोटो केटने ट्विटवर पोस्ट केला असून या फोटोमध्ये मांजरीला शोधून दाखवा असं आव्हान तिने फॉलोअर्सला केलं आहे. “आज तुम्ही या फोटोत मांजर शोधून दाखवा,” अशा कॅप्शनसहीत केटने पुस्तकांच्या एका कपाटाचा फोटो ट्विट केला आहे.

तुम्हाला सापडतेय का मांजर एकदा प्रयत्न करुन बघा बरं. बरं ही पोस्ट केल्यानंतर अर्थात आता हे वेगळं सांगण्याची गरज नाही की या फोटोवर कमेंटचा पाऊस पडाला. अनेकांनी या फोटोमध्ये मांजर कुठे दिसतेय हे शोधण्याचा, शोधताना न सापडल्याने मजेदार कमेंट करण्याचा सपाटाचा लावला आहे. पाहा काय सुरु आहे या पोस्टवर…

१) मला मदत करा

२) अशी मांजर कोणाकडे आहे का

३) मला आयुष्यात सापडणार नाही

४) या फोटोत मांजर नाहीचय

५) मी १५ मिनिटं घालवले

६) मला दोन सेकंदात सापडली कारण…

७) ही घ्या मांजर

८) खूपच सोप्प आहे असं काहीतरी सांगा

९) मांजर सापडल्याचा आनंद

१०) यात पण शोधा

११) लपलेली मांजर

१२) कमेंटमध्ये पण सापडत नाहीय

नक्की वाचा >> क्वारंटाइनमध्ये आणखीन एक चॅलेंज… या फोटोत कुत्रा शोधून दाखवा

बरं कमेंट वाचता वाचता तुम्हाला सापडली की नाही मांजर? नाही ना वाटलचं होतं. पण सहाजिक आहे. कारण ही मांजर शोधण्यासाठी लोकांनी जवळजवळ १२ हजारहून अधिक कमेंट केल्या आहेत. तर ५१ हजार लोकांनी हा फोटो रिट्विट केला आहे. असो हे पाहा कुठे आहे या फोटोत मांजर…

दिसली का? नाही अहो परत एकदा बातमीत वर जाऊन टीव्हीजवळ नीट बघा तिथेच दिसेल मांजर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2020 3:39 pm

Web Title: twitter tries to spot the cat in picture of bookshelf scsg 91
Next Stories
1 प्रत्येक जीवाची किंमत मुलाला कळायला हवी, गाईंना भरवायला शिखर मुलासह रस्त्यावर
2 ‘करोना’ची दहशत, मुलीने कोथिंबीर चक्क साबणाने धुतली; व्हिडिओ व्हायरल
3 ब्रेन ट्युमरची शस्रक्रिया सुरू असताना महिला करत होती स्वयंपाकाची तयारी
Just Now!
X