अशोक गेहलोत की सचिन पायलट या दोघांपैकी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याचा अखेर निकाल लागला आहे. दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक गेहलोतच तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. तर उप-मुख्यमंत्री म्हणून सचिन पायलट यांची निवड करण्यात आली आहे. आज काँग्रेसने एका पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. मात्र सचिन पायलट यांची मुख्यमंत्रीपदी निवड न झाल्याने अनेक तरुण नाराज झाले आहेत. एकिकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तरुणांना तरुणांच्या राजकारणाचे स्वप्न दाखवले आणि दुसरीकडे पायलट यांना डावलत गेहलोत यांच्या गळ्यातच मुख्यमंत्रीपदाची माळ घालत तरुण मतदारांची निराशा केल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

काँग्रसने या गेहलोत आणि पायलट यांच्या नियुक्तीसंदर्भातील ट्विटस केल्यानंतर त्याखाली अनेकांनी उघडपणे कमेन्टस, मीम्समधून तरुण नेतृत्व डाववल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पाहुयात काय आहे नेटकऱ्यांचे म्हणणे…

राहुलजी तुमचे चुकलेच…

याचे परिणाम २०१९ मध्ये दिसणार

हे आहेत नवीन मुख्यमंत्री

असं आहे तर

कष्ट कोणाचे फळ कोणाला…

पायलट यांची पहिली रिअॅक्शन

राजस्थानच्या जनतेला याच्याही शुभेच्छा

पायलट आणि सिंधिया एकाच माळेचे मणी

पायलट नाही तर राहुलही नाही

मेहनत कोणाची आणि…

आज संघर्षाचा पराभव झाला

दरम्यान राजस्थानातील काँग्रेसचे निरीक्षक के.सी.वेणूगोपाळ यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदासाठी अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलट यांची निवड केल्याचे जाहीर केले. अशोक गेहलोत यांची मुख्यमंत्रीपदी निवड केल्याबद्दल मी काँग्रेस अध्यक्ष आणि अन्य आमदारांचे आभार मानतो असे सचिन पायलट म्हणाले.