‘ठाकरे’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान रंगलेल्या मानापमान नाट्यानंतर संजय राऊत यांनी केलेले ट्विट चर्चेचा विषय ठरला आहे. ‘लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे’, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या ट्विटच्या माध्यमातून संजय राऊत यांनी दिग्दर्शक अभिजित पानसेंवर निशाणा साधल्याची चर्चा आता रंगली आहे. मात्र या ट्विटवरून आता सोशल नेटवर्किंगवर संजय राऊतच ट्रोल होताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाकरे चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान बुधवारी रात्री दिग्दर्शक अभिजित पानसे आणि निर्माते संजय राऊत यांच्यातील वाद हा चर्चेचा विषय ठरला होता. दिग्दर्शक अभिजित पानसे हे चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग सुरू असताना तडकाफडकी उठून गेले. अपमानित झाल्याने पानसे हे तेथून उठून गेल्याचे सांगण्यात येते. सिनेमागृहाबाहेर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोरच संजय राऊत आणि पानसे यांच्यात वाद झाला. यानंतर पानसे कुटुंबासह तिथून निघून गेले. या वादाचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी केलेले ट्विट हे सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे ठरले. ‘लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे’, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

राऊत यांनी ट्विटमध्ये पानसे यांचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी चित्रपटातून काय संदेश दिला हे सांगतानाच पानसे यांना चिमटा काढल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. मात्र आता हेच ट्विट राऊतांवर बॅकफायर होताना दिसत आहे. अनेकांनी या ट्विटवर दिलेल्या प्रतिक्रियांमधून राऊतांविरोधातील रोष दिसून येत आहे. यामध्ये राऊतांचे हे ट्विट म्हणजे उतावळेपणाचे लक्षण असल्याचे काहींनी म्हटले आहे तर काहींनी हे संजय राऊत यांनी स्वत:चे केलेले वर्णन असल्याचा टोमणा लगावला आहे. पाहुयात काय म्हणाले आहेत नेटकरी राऊतांच्या या ट्विटला उत्तर देताना…

उतावळेपणाचे लक्षण

हे तर तुमचेचे वर्णन

तुम्ही आपली पोळी भाजून घेतली

तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे मोल नष्ट केले

तुमच्या डोक्यातील अहंकार बाहेर काढा

तुम्ही तरी अहंकाराची भाषा बोलू नका

आरशासमोर ऊभे राहून ट्विट केल्या बद्दल आपल कौतुक

तुम्हीच जबाबदार

हा अहंकार आम्हाला दिसला

सेनेची प्रतिमा खराब करण्यात तुमचा हात

संधी नाही प्रतिभा होती

स्वाभिमान गहाण ठेवलाय तुम्ही

त्याच लहान मेंदूने सिनेमा दिग्दर्शित केला का

पानसेंनी सेनेला दिलेली शिकवण

शिवसेना संपावणारा

शिवसेनेची गत कौरवा सारखी होऊ नये

बदलेलेली हवा ओळखा साहेब

अभिजित पानसे हे चित्रपटाचे दिग्दर्शक असून ते सध्या मनसेत सक्रीय होते. अभिजित पानसे हे पूर्वी शिवसेनेत होते. भारतीय विद्यार्थी सेनेचे पदही त्यांच्याकडे होते. मात्र, शिवसेना पक्षश्रेष्ठींवर नाराज झाल्याने ते मनसेत गेले. स्क्रिनिंगदरम्यान झालेल्या वादानंतर मनसेचे नेतेही पानसे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या चित्रपटामुळे मनसे विरुद्ध शिवसेना असा वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter users troll sanjay raut after his tweet against abhijit panse
First published on: 24-01-2019 at 16:21 IST