News Flash

Viral Memes: “कोणीतरी हिंदीची डिक्शनरी द्या रे”, “मोदींचं हिंदी ऐकून देश आणखीन गोंधळला”

मोदींच्या भाषणातील हिंदीवर नेटकऱ्यांचे हास्य फवारे

देशाची अर्थव्यवस्था रुळांवर आणण्यासाठी २० लाख कोटींची आर्थिक मदतीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. आर्थिक सुधारणा वेगाने लागू करण्यात येतील आणि लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याचे स्वरूप नवे असेल, असे पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात स्पष्ट केले. यावेळेस त्यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ होण्याची गरज असल्याचे म्हटले. स्थानिक गोष्टी घेण्याला लोकांनी प्राधान्य देणं गरजेचं आहे असंही मोदी आपल्या भाषणामध्ये म्हणाले. पंतप्रधान मोदी आठ वाजता देशाला संबोधित करणार हे समजल्यानंतरच अनेकांनी सोशल मिडियावर चर्चा करण्यासा सुरुवात केली. त्यामुळेच #Lockdown4, #PMOfIndia, #NarendraModi हे हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसले.

मात्र मोदींनी देशाला उद्देशून हिंदीमध्ये केलेल्या भाषणामध्ये अनेक शब्द आम्ही पहिल्यांदाच ऐकल्याचे नेटकऱ्यांनी ट्विटवरुन म्हटलं आहे. इतकच नाही काहींनी दक्षिण भारतातील नागरिकांना भाषण कळलेच नसल्याचा मजेदार टोलाही ट्विटवरुन लगावला आहे. पंतप्रधान मोदींनी अगदी आत्मनिर्भर, आत्मचिंतन, भूमिका, लक्ष्य, मानव, प्रगती, संकल्प, समृद्धी, विकास, वैश्वीक संकट अशा शब्दांचा भडीमार केल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. काहींनी तर उत्तर भारतीय हिंदी पट्ट्यातील नागरिकांनाही हे हिंदी झेपलं नसेल अशा आशयाचे ट्विट केले आहेत. जाणून घेऊयात नेटकऱ्यांचे काय म्हणणे आहे.

दक्षिणेतील लोकांना समजत नाहीय

भाषण ऐकताना असं कोणाकोणाचं झालं?

हजेरी घेत होते का?

या दोघांपैकी एकच शक्यता

दक्षिण भारतामधील चित्र

हा असा काहीतरी गोंधळ आहे खरं तर

काही जणांना कळत होतं म्हणून…

यांच म्हणणं हा हिंदी न कळण्याचा फायदा

एका भाषणात एवढं काही शिकवलं

सातवीचा निबंध

हिंदी शिका

हे शब्द आहेत कुठले?

सब टायटल्स द्या

आत्मनिर्भर ऑक्सफर्डमध्ये…

मोदींनी आपल्या भाषणात लॉकडाउन ४ चा उल्लेख केला. यासंदर्भातही नेटकऱ्यांनी आधीच आपला अंदाज व्यक्त करत मिम्सचा पाऊस पडला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 9:32 am

Web Title: twitters asking for a hindi dictionary after pm modis speech leaves half the country confused scsg 91
Next Stories
1 कायमचे Work From Home करा; ट्विटरची कर्मचाऱ्यांना अजब ऑफर
2 काही मिनिटांमध्येच ‘आउट ऑफ स्टॉक’ झाला ‘हा’ शानदार फोन, पहिल्या सेलमध्ये जबरदस्त प्रतिसाद
3 ‘घरीच राहा, सुरक्षित राहा!’ स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद…; उद्यापासून जाहीर होणार टॉप १०० जणांची नावे
Just Now!
X