साप म्हटलं की आपल्याला सर्वात आधी भिती वाटते. मग शेतातून किंवा माती असणाऱ्या ठिकाणहून येणारा त्याचा फुत्कार आणि तो चावल्याने होणारी विषाची बाधा याला आपण घाबरतो. विविध जाती असलेल्या या सापांची ठेवण साधारणपणे सारखीच असल्याचे आपण पाहतो. मात्र या सापाला २ तोंडे असतील तर? हो काहीशी वेगळी वाटणारी ही गोष्ट प्रत्यक्षात घडली आहे. अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे अशाप्रकारे दोन तोंडे असलेला साप सापडला आहे. एका व्यक्तीला आपल्या घराच्या बाहेर असलेल्या आवारात हा दुर्मिळ साप सापडला आणि या व्यक्तीने लगेचच या सापाची जात ओळखण्यासाठी व्हर्जिनियाच्या सापांशी निगडीत काम करणाऱ्या सोसायटीशी संपर्क केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशाप्रकारच्या सापांना जगताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ते फार काळ जगत नाहीत असे जे.डी. क्लिओफर यांनी सांगितले. ही जात अतीशय दुर्मिळ असल्याचेही ते म्हणाले. या सापाला पकडून वाईल्डलाईफ सेंटरला नेण्यात आले आहे. याठिकाणी या सापाचा अभ्यास केला जाणार असून एकच धड आणि दोन तोंडे असताना हा साप कसा जगतो हे पाहिले जाणार आहे. सध्या या सापाला दोन तोंडांमुळे सरपटायला काहीशी अडचण होत आहे. या सापाच्या तोंडातील डावीकडचे तोंड जास्त वर्चस्व गाजविणारे असून ते जास्त अॅक्टीव्ह असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. या सापाची विशेष काळजी घेतली जात असून तो सामान्यांना पाहण्याची परवानगी नसल्याचेही सांगण्यात आले आहे. जर हा साप काही काळ जगला तर तो अभ्यासासाठी प्राणीसंग्रहालयाला देण्यात येईल. सोशल मीडियावर या सापाचा व्हिडियो कमी वेळात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून असंख्य लोकांनी त्याला लाईक केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two headed baby snake found in virginia
First published on: 25-09-2018 at 14:08 IST