भारतात अशी अनेक खेडी आहेत जिथे अनेक घरांत शौचालय नाही. उघड्यावर शौचालयाला जाऊ नये यासाठी अनेक गावात सरकारकडून वेगवेगळ्या मोहिम राबवल्या गेल्या. अमिताभ बच्चन, आमीर खान, विद्या बालन, सचिन तेंडूलकर यासाख्या दिग्गजांनी भारत सरकारच्या या स्वच्छ भारत मोहिमेच्या प्रचारसाठी हातभार लावला. यापासून प्रेरणा घेत अनेकांनी आपले गाव हागणदारी मुक्त बनवण्यासाठी प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी नव-या मुलाच्या घरात शौचालय नसल्याने एका तरुणीने लग्नाला नकार दिला होता. तर एका महिलेने शौचालय बनवण्यासाठी आपले मंगळसुत्र गहाण टाकले होते. यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे आता या यादीत आणखी दोन बहिणींचा समावेश झाला आहे. आपल्या शिष्यवृत्तीच्या पैशांतून आणि प्रसंगी गवंडीकाम करून कमावलेल्या पैशांतून या बहिणींनी आपल्या घरात शौचालय बांधले.

वाचा : भाजीवालीचा उपक्रम, घरात शौचालय दाखवा आणि १ किलो टोमॅटो मोफत मिळवा

झारखंडमधल्या खूंटी या छोट्याश्या गावांत पुनिया आणि तिची बहिण राहते. पुनिया कॉलेजमध्ये शिकते. जेव्हा घरात शौचालय नसल्याने तिच्या वर्गमैत्रिणी तिला चिडवायच्या तेव्हा पुनियाला वाईट वाटायचे. शेवटी आपल्या घरात शौचालय बांधण्याचे तिने ठरवले. तिने वडिलांना हा विचार बोलून दाखवला पण वडिलांनी तिला यात साथ दिली नाही. तेव्हा पुनियाने आपल्या शाळेत शिकणा-या बहिणीला सोबत घेऊन गवंडी आणि सुतारकाम करायला सुरूवात केली. यातून तिला पैसे मिळाले शिवाय शिष्यवृत्तीचे पैसेही तिच्याजवळ होते. या पैशांतून पुनियाने आपल्या घरात शौचालय बांधले. आता खूंटी गावातील रहिवाश्यांसाठी या दोन्ही बहिणा नवीन प्रेरणा ठरल्या आहेत. भारताच्या अनेक गावांत आजही शौचालय नाही तेव्हा गावातील महिला पुढाकार घेऊन घरात आवर्जुन शैचालय बांधून घेत आहेत.

वाचा : सोन्याचा कमोड वापरण्यासाठी लोक तासन् तास रांगेत उभे