फेसबुक लाइव्ह करताना तलावात बोट उलटल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यात घडलीये. घटनेवेळी बोटीमध्ये सहा तरुण होते अशी माहिती आहे.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, रविवारी दुपारी मैरितार गावातील सहा तरुण सुरहा ताल तलावातून एका बोटीने जवळच असलेल्या बेटावर जात होते. प्रवासादरम्यान त्यातील काही जणांनी व्हिडिओ शूट करायचं ठरवलं आणि बोटीतला प्रवास फेसबुक लाइव्ह करायला सुरूवात केली. मजा-मस्ती करत फेसबुक लाइव्ह करत असतानाच अचानक बोट अनियंत्रित झाली आणि तलावात उलटली. त्यासोबतच बोटीतील सर्व तरुण पाण्यात बुडाले.
नाविकाने पाण्यातून तरुणांना बाहेर काढलं, त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यातील दोन जणांना अनुज गुप्ता (वय – 25) आणि दीपक गुप्ता ( वय -26) यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केलं. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठण्यात आले आहेत. बांसदी पोलिस स्थानकाचे प्रमुख राजेश कुमार सिंह यांनी याबाबत माहिती दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 22, 2021 10:16 am