News Flash

‘उबर’चे ग्राहकांसाठी ‘फ्लाईंग टॅक्सी’ आणण्याचे बेत

'नासा'च्या अनुभवी इंजिनिअरची घेणार मदत

उबर आणणार ताजं जेवण!

१९९० च्या दशकात कार्टून नेटवर्कवर प्रसारित होणारं ‘द जेटसन्स’ कार्टून कोणाला आठवतंय? त्या कार्टूनमध्ये भविष्यातलं शहर दाखवलं होतं आणि उडणाऱ्या गाड्यांमधून प्रवास करणारे तिथले नागरिक यात दाखवले होते.

अशाच प्रकारचं काहीसं येत्या काही वर्षांमध्ये प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण ‘उबर’ कंपनीने आता अशा प्रकारच्या उडणाऱ्या कार्स डेव्हलप करण्यासाठी नासाच्या एका अनुभवी इंजिनिअरला आपल्याकडे घेतलंय. ‘नासा’ मध्ये ३० वर काम केलेल्या मार्क मूरला उबर ने आपल्या ‘उबर एलिव्हेट’ या प्रोजेक्टसाठी मोठ्या पदावर घेतलंय. तो आता ‘डायरेक्टर आॅफ इंजिनिअरिंग फाॅर एव्हिएशन’ या पदावर असणार आहे.

२०१० साली मार्कने या प्रकारची उडणारी वाहनं सर्वसामान्यांच्या वापरासाठी तयार करण्याबाबत नासामध्ये एक अहवाल सादर केला होता. या अहवालाची दखल घेत गूगल च्या लॅरी पेजने या दिशेने संशोधन करण्यासाठी मोठी गुंतवणूक केली होती. आता गूगलची याबाबतीतली स्पर्धक कंपनी ‘उबर’ ने मार्क मूरला आपल्याकडे घेत एक मोठा संदेश मार्केटमध्ये दिला आहे.

VIDEO: ट्रॅफिक जॅमला कंटाळत गुंडांनी किडनॅप केलेल्या व्यक्तीला दिलं सोडून!

‘उबर’ कंपनीची आपल्याला काही नव्याने ओळख करून देण्याची गरज नाहीये. टॅक्सीसर्व्हिससाठी ‘उबर’चं नाव जगप्रसिध्द आहे. जगात ‘उबर’ चे जवळपास साडेपाच कोटी ग्राहक आहेत. असं स्ट्राॅंग फाॅलोविंग असताना उबर एलिव्हेट च्या माध्यमातून जर उडत्या गाड्या ग्राहकांना उपलब्ध झाल्या तर काय धमाल!

विचार करा ना! मुंबईतल्या नरीमन पाॅईंवरून गिरगावात जाण्यासाठी तुम्ही ‘उबर’ अॅपवरून टॅक्सी मागवली, काही वेळातच ती टॅक्सी आली आणि संपूर्ण मरीन ड्राईव्हला वळसा घालत ट्रॅफिकमधून जाण्यापेक्षा थेट या गाडीने समुद्रावरून उड्डाणा केलं. निळ्याशार पाण्यावरून क्वीन्स नेकलेसचं जबरदस्त दर्शन घडवत ही गाडी गिरगाव  चौपाटीजवळ उतरली आणि दोन मिनिटात तुम्ही तुमच्या घरी पोचलात! मजा आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 6:14 pm

Web Title: uber ropes in nasa engineer for its flying taxi project
Next Stories
1 Video : छेडछाड करणा-या रोड रोमियोला असा शिकवला धडा
2 VIDEO: ट्रॅफिक जॅमला कंटाळत गुंडांनी किडनॅप केलेल्या व्यक्तीला दिलं सोडून!
3 Viral Video : कोळ्याच्या जाळ्यात अडकला विषारी साप
Just Now!
X