13 December 2018

News Flash

… म्हणून गुगलनं प्ले स्टोअरवरून हटवलं UC Browser

कोट्यवधी लोकांनी डाऊनलोड केलं होतं

चीनमधील प्रसिद्ध कंपनी अलीबाबाचे हे ब्राऊजर आहे.

गुगलनं प्ले स्टोअरमधून UC Browser हे अॅप काढून टाकलं आहे. भारतात सर्वाधिक डाऊनलोड करण्यात येणारं हे सहाव्या क्रमांकाचं अॅप होतं. पण गेल्या काही दिवसांपासून या ब्राऊजरमुळे महत्त्वाची माहिती चोरीला जात असल्याचे उघड झाल्यानंतर हे अॅप प्लेस्टोअरमधून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या ब्राऊजरमधून भारतीयांची महत्त्वाची माहिती चोरी करण्यात येत असून ही माहिती चीनमधल्या सर्व्हरला पाठवली जात असल्याची धक्कादायक गोष्ट उघड झाली होती. डेटा हॅक होण्याच्या तक्रारी वारंवार करण्यात येत होत्या. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली. डेटा हॅकिंग आणि सुरक्षेच्या कारणामुळे अखेर प्लेस्टोअरमधून हे अॅप काढून टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अँड्राईड फोनसाठी हे अॅप उपलब्ध नाही पण अॅपल स्टोअरवर मात्र अद्यापही हे अॅप उपलब्ध आहे.

भारतीय तरुणाने स्थापन केला ‘किंग्डम ऑफ दीक्षित’ नावाचा देश

चीनमधील प्रसिद्ध कंपनी अलीबाबाचे हे ब्राऊजर आहे. आतापर्यंत जगभरातून ५० कोटींहून अधिक लोकांनी हे ब्राऊजर डाऊनलोड केले आहे. फक्त भारतातच नाही तर कॅनडिअन नागरिकांनी देखील युसी ब्राऊजरमधून डेटा चोरीला जात असल्याची तक्रार २०१५ मध्ये केली होती.

First Published on November 15, 2017 1:03 pm

Web Title: uc browser app vanishes from google play store