संसदेत गैरहजर राहणा-या खासदारांचे करायचे काय? असा प्रश्न या पुढे तरी युक्रेनला पडणार हे नक्की. त्याचे झाले असे की संसदेत ३३२ खासदारांपैकी १५० खासदारांनी दांड्या मारल्या होत्या आता, ही बेफ्रीकरी काही उपस्थित खासदारांच्या पचनी पडली नाही. बरं दमदाटी करून काही या खासदारांना इथे बसवता येणार नाही, तेव्हा शक्ती पेक्षा युक्ती लढवत एका खासदाराने असे काही केले की खासदारांच्या अनुपस्थितीकडे या देशतील नागरिकांचे नाही तर इतरांचेही लक्ष गेले.
VIDEO: रेल्वे ट्रॅकवर सायकल चालवणाऱ्या महामानवांना अॅक्सिडंटपासून कसं वाचवाल?
संसदेत सतत असणा-या खासदारांच्या अनुपस्थितीवर लक्ष वेधण्यासाठी युक्रेनमधले खासदार बोरीस्लाव बेरेजा एक खेळणं घेऊन चक्क संसदेत पोहोचले. आपल्या शेजारच्या एका खासदाराच्या आसनावर त्यांनी खेळणे ठेवले. हे खेळणे डच कलाकार वान ब्रीवूर्टच्या कलाकृतीची अगदी साधर्म्य दाखवणारे होते. डॉक्टरांची वाट बघत बसलेल्या बिचा-या रुग्णांची केविलवाणी कथा दर्शवणारे ते प्रतिकात्मक स्वरुप होते. हेच खेळणे त्यांनी खासदारांच्या खुर्चीवर ठेवले. खासदारांची अनुपस्थिती हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. त्यादिवशी संसदेत ३३२ पैकी १५० खासदार अनुपस्थित होते. खासदारांनी किमान संसदेत उपस्थिती लावून काम करावे अशी आशा लोकांची आहे, आणि वान ब्रीवूर्टच्या खेळण्यासारखीच ही बिचारी जनता आपल्या खासदारांची वाट बघत आहे असे त्यांना दाखवायचे होते.
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. युक्रेनची जनता खासदारांवर सतत टीका करत आहे. यातले अर्ध्याधिक खासदार आपल्या बेजबाबदार वागण्यासाठी बदनाम आहेत तेव्हा निदान संसदेत उपस्थित राहून आपली जबाबदारी पार पाडावी अशी अपेक्षा ते करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2017 11:39 am