पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने २०१४ मध्ये राष्ट्रीय स्तरावर स्वच्छ भारत अभियान राबवण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी या मोहिमेची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात आहे. ‘स्वच्छ भारता’साठी स्वतः मोदी मेहनत घेत आहेत. पण मोदींच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांनीच त्यावर पाणी फेरल्याचे समोर आले आहे. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ते एका सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करत असल्याचे दिसते. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांना ते सहन झालं नाही. काहींनी टीकेची झोड उठवली असून, काहींनी तर त्यांची जोरदार खिल्ली उडवली आहे.

radhamohan

कृषिमंत्री राधामोहन यांचा व्हायरल झालेला फोटो संतापजनक असल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. पण सध्यातरी हा फोटो नक्की कुठला आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्विटरवरही ट्विट केला जात आहे. या फोटोत मंत्री एका भिंतीजवळ लघुशंका करताना दिसत आहेत. त्या ठिकाणापासून काही पावलांवरच त्यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षक उभे आहेत. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी हे स्वच्छता अभियानाचा जोरदार प्रचार-प्रसार करत आहेत. गावं हगणदारीमुक्त होत आहेत. त्याचं मोदींकडून कौतुकही होत आहे. गावागावांत शौचालये बांधली जात आहेत. एकीकडं स्वच्छ भारताचं पाहिलं जात आहे. तर दुसरीकडे सरकारमधील मंत्रीच या स्वप्नांचा चुराडा करण्याचे काम करत आहेत, अशा शब्दांत नेटकरी टीका करत आहेत. या फोटोची शाहनिशा झाली नसली तरी अनेकांनी मंत्र्यांची खिल्ली उडवली आहे.