17 July 2019

News Flash

VIDEO: जीभ कपाळाला टेकवणारा अवलिया पाहिलात का ?

साधी नाकापर्यंत न जाणारी जीभ कपाळापर्यंत कशी न्यायची...हे अशक्यच आहे असंच तुमचं म्हणणं असेल

तुम्ही तुमची जीभ कपाळाला टेकवू शकता का ? असा प्रश्न जर कोणी तुम्हाला विचारला तर नक्कीच डोकं फिरलं आहे का असं विचाराल. साधी नाकापर्यंत न जाणारी जीभ कपाळापर्यंत कशी न्यायची…हे अशक्यच आहे असंच तुमचं म्हणणं असेल. पण असं म्हणतात जगात काहीच अशक्य नाही. नेपाळच्या एका बस चालकाने ही अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली आहे.

यज्ञ बहादुर कटुवाल (35) असं या बस अवलिया बस चालकाचं नाव आहे. त्यांचा दावा आहे की, आपली जीभ जगात सगळ्यात मोठी आहे. तसंच जीभेच्या सहाय्याने नाक पूर्णपणे झाकून ती कपाळाला टेकवू शकतो असंही ते सांगतात.

यज्ञ बहादुर कटुवाल यांच्या एका मित्राने त्यांचा व्हिडीओ शूट करत हे काहीतरी वेगळं असल्याचं सांगत सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर तर यज्ञ कटुवाल स्थानिकांमध्ये सेलिब्रेटीच झाले. त्यांना पाहण्यासाठी, भेटण्यासाठी लोक येऊ लागले आहेत. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्याकडे असलेलं हे अनोखं कौशल्य आपल्याला गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान देऊ शकतं असा विश्वास ते व्यक्त करत आहेत.

First Published on December 4, 2018 2:19 am

Web Title: unusual ability to lick own forehead