21 January 2021

News Flash

Viral Video : अमेरिकन संसदेत हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांच्या गर्दीत दिसला भारताचा झेंडा

हा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय

(फोटो सौजन्य: स्क्रीनशॉर्ट)

अमेरिकेत अभूतपूर्व सत्तासंघर्ष सुरु असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत म्हणजेच कॅपिटॉल इमारतीबाहेर जोरदार गोंधळ घातला असून हिंसाचार केला आहे. ट्रम्प समर्थक हजारोंच्या संख्येने इमारतीबाहेर जमा झाले होते. जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची बैठक सुरु असतानाच ट्रम्प समर्थकांनी गोंधळ घालत हिंसाचार करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान यावेळी झालेल्या पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत चार जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. या हिंसाचाराचा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. मोदींनी लोकशाहीचा संदर्भ देत या घटनेमुळे दु:ख झाल्याचं म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे सोशल नेटवर्किंगवर या हिंसाचारामध्ये सहभागी असणाऱ्या आंदोलकांपैकी एकाच्या हातात चक्क भारताचा तिरंगा झेंडा दिसत असल्याचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

नक्की पाहा हे फोटो >> खुर्चांखाली लपलेले नेते, हिंसक आंदोलक अन् आरडाओरड… अमेरिकन संसदेतील थरार

राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये अमेरिकेच्या संसदेत जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची बैठक सुरु असतानाच हजारो ट्रम्प समर्थक संसदेच्या इमारतीबाहेर जमा झाले. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालून संसदेच्या इमारतीमध्ये घुसखोरी केली. ट्रम्प समर्थकांकडून हिंसाचार केला गेला आहे. अमेरिकेच्या संसदेत तोडफोड करण्यात आली आहे. पोलीस आणि आंदोलकांमध्ये जवळपास चार तास संघर्ष सुरु होता. चार तासांनी पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलं. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी गोळीबार केला. वेगवेगळ्या घटनांमध्ये या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हिंसाचार करणाऱ्या ५२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कर्फ्यू असतानाही नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तसंच कॅपिटॉलमधील हिंसाचार प्रकरणी ही कारवाई कऱण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “लोकशाहीबद्दल अमेरिकेला सल्ला कोण देतंय पाहा”, मोदींच्या प्रतिक्रियेवरुन विरोधक आणि समर्थक भिडले

अमेरिक संसदेबाहेर हा सारा गोंधळ कसा घडला, आंदोलकांनी कशापद्धतीने संसदेत प्रवेश मिळवला यासंदर्भातील अनेक फोटो व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यापैकी सर्वच व्हिडीओ आणि फोटोंमध्ये व्हाइट हाऊससमोर उभ्या असणाऱ्या ट्रम्प समर्थकांच्या हातात अमेरिकेचे झेंडे आणि ट्रम्प यांच्या नावाचे पोस्टर्स दिसत आहेत. मात्र यातील एका व्हिडीओत आंदोलकांपैकी एका व्यक्तीच्या हातात भारताचा तिरंगाही दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये अमेरिकन संसदेसमोर आंदोलक उभे असून अचानक या आंदोलकांपैकी एक व्यक्ती भारताचा झेंडा फडकवताना दिसते. नंतर हा झेंडा गर्दीमध्ये गायब होतो. हा झेंडा नक्की कोणी तिथे आणला, हा व्हिडीओ कोणी काढला यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नसली तरी व्हिडीओमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी हा झेंडा इथे कसा आला यासंदर्भात प्रश्न उपस्थित करत आश्चर्य व्यक्त केलं आहे तुम्हीच पाहा हा व्हायरल व्हिडीओ…

मोदींनीही दिली प्रतिक्रिया

अमेरिकेतील या हिंसेचे जगभरात पडसाद उमटले असून यावर जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यावर भाष्य केलं असून हिंसाचाराच्या बातम्या पाहून आपण दु:खी झाल्याचं म्हटलं आहे. वॉशिंग्टन डी. सी. मधील दंगल आणि हिंसाचाराच्या बातम्या पाहून अस्वस्थ झालो. शांततेच्या मार्गाने योग्य पद्धतीने सत्ता हस्तांतरण झालं पाहिजे. कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या निषेधाच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेला डाग लागता कामा नये, अशा अर्थाचं ट्विट मोदींनी केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 2:51 pm

Web Title: us capitol violence indian tricolor flag seen viral video of protesters crowd scsg 91
Next Stories
1 “लोकशाहीबद्दल अमेरिकेला सल्ला कोण देतंय पाहा”, मोदींच्या प्रतिक्रियेवरुन विरोधक आणि समर्थक भिडले
2 किचनमध्ये कुत्रा निपचित पडला होता, मालकाला आली भलतीच शंका; सत्य समोर आलं अन्…
3 प्रेयसीने विवाहित प्रियकराला मिळवण्यासाठी मोजले तब्बल दीड कोटी रुपये, का लावली प्रेमाची किंमत?
Just Now!
X