X
X

‘या’ कंपनीमध्ये नोकरीसाठी ‘रिझ्युमे’ नाही तर ‘लव्ह लेटर’ महत्वाचे

नोकरी करायची असल्यास आपण तिथे प्रथम आपला रिझ्युमे पाठवतो. पण...

एखाद्या ठिकाणी नोकरी करायची असल्यास आपण तिथे प्रथम आपला रिझ्युमे पाठवतो. पण अमेरिकेतील एका कंपनीमध्ये रिझ्युमे न घेतला लव्ह लेटर लिहून घेतले जाते. अॅक्विटी शेड्यूलिंग नावाची कंपनी उमेदवारांकडे रिझ्युमे नाही तर लव्ह लेटर मागते. या कंपनीत अर्ज करायाचा असेल तर सर्वात आधी तुम्हाला लव्ह लेटर लिहावे लागेल.

कंपनी उमेदवारांकडून आलेले लव्ह लेटर्स वाचते आणि त्या आधारावर कंपनीसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाते. याच आधारावर त्यांना पुढच्या राऊंडसाठी बोलवले जाते. अॅक्विटी शेड्यूलिंग कंपनी वर्क ऑफ होम म्हणजेच घरातून काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देते. उमेदवाराला दिवसातून फक्त ६ तास काम करायचे आहे.

अब्जाधीश उद्योग सम्राटाचा एक पानी रिझ्युमे पाहिलात का?

उमेदवाराच्या मनातील विचार जाणून घेणे, हा लव्ह लेटर लिहायला सांगण्यामागचा उद्देश असतो. ती व्यक्ती कसा विचार करते, त्याची विचारधारा काय आहे, हे जाणून घेता येते, आणि हे सर्व त्या लव्ह लेटरवरुन समजते असे मत अॅक्विटी शेड्यूलिंग कंपनीचे सीईओ गेविन जुचलिंस्की यांचे आहे. जॉब करणे आणि डेडिंग करण्यात काहीच फरक नाही. दोन्ही एकसारखेच आहे. आम्ही उमेदवारांचे रिझ्युमेही मागवतो पण तो शवटच्या राऊंडला असेही सीईओ म्हणाले.

23
First Published on: August 9, 2018 2:20 pm
  • Tags: job,
  • Just Now!
    X