अद्भूत भारत.. या भारतात जो कोणी परदेशी पाहुणा पर्यटनासाठी येतो त्याला इथल्या सौंदर्यची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. भारत निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे त्यातून केरळची तर गोष्टच निराळी. ‘देवाची भूमी’ म्हणून हे राज्य ओळखलं जातं. इथले समुद्र, नद्या, माडाची झाडं सारंच काही बघणा-याला मोहून टाकतं. या केरळची मोहिनी काही वर्षांपूर्वी  इथे आलेल्या लॉस एन्जलिसच्या एका जोडप्याला पडली. इथे आल्यानंतर आपण स्वर्गात आलो असल्यासारखंच त्यांना वाटलं, केरळची मोहिनी या जोडप्यावर अशी काही होती की त्यांनी आपल्या मुलीचे नाव ‘केरळ’ ठेवलं.

चार्ल्स क्रॅमर आणि त्यांची पत्नी ब्रीना २००४ मध्ये केरळमध्ये पर्यटनासाठी आले होते. केरळच्या सौंद्यर्याने हे दोघेही भारावून गेले. २००९मध्ये जेव्हा त्यांना मुलगी झाली तेव्हा त्यांनी तिचे नाव केरळ असे ठेवले. याच मुलीला घेऊन ते पुन्हा एकदा भारतात आले आहेत. यापूर्वी छोट्या केरळला आपलं नाव असं जगावेगळं का ठेवलं असा प्रश्न नेहमीच पडायचा पण केरळ पाहून  बालमनाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळलं अशी प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी दिली. सध्या क्रॅमर कुंटुंब  ‘Worldschool101’ या प्रोजक्टसाठी भारतात आले आहेत. या प्रोजेक्ट अंतर्गत ते प्रत्येक देशातील गावांत चार आठवडे राहणार आहेत आणि तिथल्याच शाळांत आपल्या मुलांना शिकवणार आहे.

वाचा : नऊ गोळ्या लागूनही CRPF जवान चेतनकुमार चिताह सुखरूप

वाचा : लवकरच व्हॉटस्अॅपवर येणार ‘हे’ नवे फिचर