News Flash

VIDEO : रक्षाबंधनच्या शुभेच्छा पण अमेरिकन स्टाईलनं!

अमेरिकन दूतावासानं व्हिडिओ शेअर केलाय

भारतात असणाऱ्या अमेरिकन दूतावासाकडून एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय

आपण ज्या देशात राहतो त्या त्या देशाची संस्कृती, परंपरा, सण, उत्सव याबद्दल आपल्याला माहिती असलीच पाहिजे. आणि हेच लक्षात घेऊन भारतात असणाऱ्या अमेरिकन दूतावासानं आज भारतीय जनतेला रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्यात, त्याही अगदी अनोख्या स्टाईलनं.
भारतात असणाऱ्या अमेरिकन दूतावासाकडून एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय. रक्षाबंधनच्या शुभेच्छा देणारा हा व्हिडिओ असून भारतीयांच्या खूपच पसंतीस हा व्हिडिओ उतरत आहे. अमेरिकन दूतावासाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हिंदीतून भारतीयांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा देण्यात आल्यात. भारतीयांना ‘रक्षाबंधन’चं महत्त्व माहिती आहे पण अनेक अमेरिकन नागरिकांसाठी मात्र हा सण नवीनच असावा. तेव्हा दोन अमेरिकन मुलं रक्षाबंधनचं महत्त्व सांगत आहे. भारतात बहिण आणि भावाचं नातं किती स्पेशल असतं हे दोन मुलांनी व्हिडिओतून सांगितलं आहे. विशेष म्हणजे ही दोन्ही मुलं पारंपारिक पेहरावात आहेत आणि भारतीय विधीप्रमाणे ते रक्षाबंधन साजरा करत आहेत.

वाचा : मोदींची पाकिस्तानी बहिण, ३६ वर्षांपासून बांधते राखी

वाचा : ना दागिने, ना पैशांचा आहेर, भावाने बहिणाला भेट म्हणून दिले शौचालय

वाचा : म्हणून रक्षाबंधनला भावाला हेल्मेट भेट द्या!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 4:51 pm

Web Title: us embassy india%e2%80%8f raksha bandhan video 2017
Next Stories
1 ..आणि स्वातंत्र्यदिनाला कोणती साडी नेसावी या प्रश्नाने ‘त्या’ झाल्या हैराण
2 म्हणून रक्षाबंधनला भावाला हेल्मेट भेट द्या!
3 ना दागिने, ना पैशांचा आहेर, भावाने बहिणाला भेट म्हणून दिले शौचालय
Just Now!
X