News Flash

उसेन बोल्टच्या जुळ्या पोरांची नाव ऐकून नेटकरी म्हणाले, “घरात वादळी वातावरणाची शक्यता”

उसेन आणि केसी यांना दोन जुळी बाळं झाली असून यापूर्वी त्यांना ऑलम्पिया लायटनिंग नावाची मुलगी आहे. आता या दोन बाळांची नावंही चांगलीच चर्चेत आहेत

सोशल नेटवर्किंगवरुन उसेन बोल्टनेच यासंदर्भातील माहिती दिली. (फोटो सौजन्य : उसेन बोल्टच्या इन्स्ताग्रामवरुन साभार)

जमैकाचा ऑलिम्पिक व विश्वविजेता धावपटू उसेन बोल्ट आणि त्याची पार्टनर केसी बेनेट यांनी रविवारी जुळ्या मुलांच्या जन्माची माहिती जाहीर केली. विशेष म्हणजे या पैकी एका मुलाचं नावं थंडर बोल्ट असून दुसऱ्याचं नाव सेंट लिओ बोल्ट असं ठेवण्यात आलं आहे.

बोल्टने सोशल नेटवर्किंगवरुन यासंदर्भातील घोषणा केली. फादर्स डे निमित्त फॅमेली फोटो पोस्ट करत त्याने आपल्या मुलांच्या नावाची घोषणा केली. बोल्टने पोस्टमध्ये विजांचे इमोन्जी वापरत मुलांच्या नावाची घोषणा केली असली तरी त्यांचा जन्म कधी झालाय याची माहिती दिली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Usain St.Leo Bolt (@usainbolt)

बोल्टची पार्टनर केसीनेही फोटो शेअर केला असून या फोटोंमध्ये दोन जुळ्या मुलांबरोबरच या दोघांची मुलगी ऑलम्पिया लायटनिंग बोल्टही दिसत आहे. केसीने या फोटोला कॅप्शन देताना, “माझ्या फॉरएव्हर प्रेमाला फादर्स डेच्या शुभेच्छा. उसेन बोल्ट तू या कुटुंबाचा आधार आहे आणि आपल्या मुलासाठी सर्वोत्तम वडील आहे. आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे,” असं म्हटलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kasi J. Bennett (@kasi.b)

ऑलम्पियाचा जन्म २०२० साली झाला आहे. मात्र तिच्या नावाची घोषणाही तिच्या जन्मानंतर दोन महिन्यांनी करण्यात आलेली. आता पुन्हा एकदा उसेन बोल्टने आपल्या मुलांची नावं ठेवताना विजेशी त्याचा संदर्भ असेल याची काळजी घेतल्याने नेटकऱ्यांनी या नावांबद्दल अनेक प्रतिक्रिया नोंदवल्यात.

१) घरात वादळी वातावरणाची शक्यता

२) या मुलांना नाव सार्थकी लावावं लागणार

३) एकाचं नाव का असं

४) म्हणून अशी नावं ठेवली

३४ वर्षीय बोल्टने ऑलिम्पिक २००८, २०१२ आणि २०१६ मध्ये तब्बल आठ सुर्वण पदकांची कमाई केली. करोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये बोल्ट सहभागी होणार नाहीय. बोल्टने २०१७ साली निवृत्तीची घोषणा केलीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 10:33 am

Web Title: usain bolt has twin boys their names take social media by storm scsg 91
टॅग : Usain Bolt
Next Stories
1 वय वर्ष ८३..! ‘वेटलिफ्टर दादी’चा व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
2 ‘बाबा का ढाबा’च्या कांता प्रसादांनी तक्रार दिल्यानंतर गौरवने परत केली होती रक्कम; पोलिसांची माहिती
3 VIDEO: डोंगराळ भागात PPE कीटमध्येच डॉक्टर थिरकले ‘काला चश्मा’वर; केंद्रीय मंत्र्यांनी व्हिडिओ केला पोस्ट
Just Now!
X