करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या कालावधीमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात आली होती. दवाखाने, बँका आणि आरोग्यसेवांबरोबरच पाणी, वीज यासारख्या अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारीही या कालावधीमध्ये काम करत होते. अशाच एका महिला कर्मचाऱ्याचा व्हिडिओ ट्विटवरुन ऑल इंडिया रेडिओ न्यूजने शेअर केला आहे. वीज विभागामध्ये काम करणारी ही महिला कर्मचारी महाराष्ट्रामधील बीड जिल्ह्यातील आहे.

ऑल इंडिया रेडिओ न्यूजच्या  @airnewsalerts य़ा ट्विटर हॅण्डलवरुन एक मिनिटं ३६ सेकंदांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एक महिला वीजेच्या खांबावर चढून दुरुस्ती करताना दिसत आहे. “एखादी महिला वीजेच्या खांबावर चढून वायर दुरुस्त करत असल्याचे तुम्ही कधी ऐकलं आहे का? तर या आहेत महाराष्ट्रामधील बीड येथील उषा जगदाळे. पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या या श्रेत्रामध्ये उषा या अपवाद आहेत. ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर त्याची तातडीने दखल घेत त्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये वीजपुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेतात,” असं हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आलं आहे. व्हिडिओमध्ये उषा या काही सेकंदांमध्ये कोणत्याही दोरीचा किंवा क्रेनचा आधार न घेता काही फूट उंच खांबावर नारळाच्या झाडावर चढल्याप्रमाणे चढतात. खांबावर चढल्यानंतर त्या स्वत:चा तोल सावरत गुंतागुंतीच्या वायर्समधील बिघाड दूर करतानाही व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत

हा व्हिडिओ दोन हजारहून अधिक जणांनी शेअर केला आहे. तर अवघ्या २४ तासांमध्ये व्हिडिओला एक लाख ६८ हजारहून अधिक व्ह्यूज आहेत. मात्र या व्हिडिओखाली अनेकांनी अशाप्रकारे या महिलेला जीव धोक्यात टाकून काम करावं लागत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या महिलेच्या शौर्याला सलाम करतच तिच्याबद्दलची चिंता अनेकांनी व्यक्त केल्याचे व्हिडिओखालील कमेंटमध्ये दिसून येत आहे.