03 March 2021

News Flash

युपीच्या जंगलात सापडली ‘मोगली’

माकडांसोबत राहायची मुलगी

(छाया सौजन्य : टाइम्स ऑफ इंडिया)

मध्य प्रदेशच्या जंगलात लांडग्यांच्या कळपासोबत मोगली राहायचा. लांगड्यांनीच त्याला लहानाचे मोठे केले. लहानपणी ‘जंगल बुक’ कार्टुनच्या माध्यमातून माणसांपासून दूर जंगलात राहणारा मोगली घराघरात पोहोचला. मोगलीच ही गोष्ट काल्पनीक होती. पण युपीच्या जंगलात मात्र अशी गोष्ट प्रत्यक्षात पाहायला मिळाली आहे, येथे एका पोलीस अधिका-याला जंगलात माकडांसोबत राहणारी आठ वर्षांची मुलगी सापडली आहे. उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये कतर्नियाघाट वन्य जीव अभयारण्य आहे या जंगलात काही महिन्यांपूर्वी लाकडूतोड्यांनी एक अजब प्रकार पाहिला. येथे काही लोकांना माकडांच्या कळपाबरोबर हिंडताना एक आठ वर्षांची मुलगी दिसली. हा प्रकार त्यांच्यासाठी थोडा धक्कादायक होता. या मुलीला माकडांपासून वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण माकडांनी काही या लोकांना तिच्या जवळ फिरकू दिले नाही उलट त्यांच्यावर माकडांनी हल्ला चढवला.

त्यांनी ही गोष्ट पोलिसांना कळवली, पण पोलिसांना काही ती मुलगी दिसली नाही. अखेर पोलीस उपनिरिक्षक सुरेश यादव यांना माकडांच्या कळपात ही मुलगी दिसली. त्यांनी माकडांच्या तावडीतून कसेबसे तिला सोडवले आणि रुग्णालयात भरती केले. या मुलीला ना बोलता येते, ना माणसांची भाषा समजत. ती माकडांसारखी चालते आणि खातेही माकडांसारखी.  पहिल्यांदाच माणसांना पाहिलं असल्याने ती पूर्णपणे गांगरून गेली. रुग्णालयातल्या माणसांवरही ती माकडांसारखेच हावभाव करत धावून गेली. ही मुलगी कोण आहे, ती कधीपासून राहते याचा काहिच पत्ता पोलिसांना नाही. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. माकडांसोबत राहणा-या या मुलीला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी रुग्णालयाच्या आसपास केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 12:39 pm

Web Title: uttar pradesh police found girl living with monkey
Next Stories
1 अवघ्या पाच मिनिटांत ४६२ कोटींना विकला गेला दुर्मिळ हिरा
2 हल्ल्यात मारल्या गेलेल्या जुळ्या मुलांची सिरियन वडिलांनी काढली अंत्ययात्रा
3 Viral Video : तिने केस कापले पण का…?
Just Now!
X