जगभरामध्ये कोरनाने थैमान घातलं आहे. आपल्याला करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येकजण काळजी घेताना दिसत आहे. सरकारी पातळीवरही या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक देशांनी प्रवासावर तसेच सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर निर्बंध घातले आहेत. असं असतानाच एका देशाने मात्र एक आगळीवेळी घोषणा केली आहे. आमच्या देशात आलेल्या एखाद्या व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाल्यास त्याला सरकारकडून तीन हजार अमेरिकन डॉलरचा (भारतीय चलनानुसार २ लाख २३ हजार रुपये) निधी दिला जाईल अशी घोषणा मध्य आशियामधील एका देशाने केली आहे. ही घोषणा करणार देश आहे उझबेकिस्तान. उझबेकिस्तान सरकारने केलेल्या या घोषणेबद्दलचे वृत्त व्हाइस युएस या वेबसाईटने दिलं आहे.

नक्की पाहा हे फोटो >> भारतीय वंशाचा नेता झाला दक्षिण अमेरिकेतील देशाचा राष्ट्राध्यक्ष

उझबेकिस्तानमध्ये करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी तीन हजार डॉलरचा सरासरी खर्च येत असल्याने सरकारने परदेशातून आलेल्या नागरिकांना कोरनाची बाधा झाल्यास एवढी रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवे नियम केले असून सॅनिटायझेशनच्या नवी पद्धतीचाही अवलंब केला आहे. याच उपाययोजनांवर विश्वास ठेवत सरकारने ही घोषणा केल्याचे सांगण्यात येत आहे.

उझबेकिस्तानच्या युनायटेड किंग्डममधील ब्रँड अ‍ॅम्बेसिडर असणाऱ्या सोफिया इबोटसन यांनी यासंदर्भातील अधिक माहिती दिली. “पर्यटक मनात कोणतीही भिती न बाळगता उझबेकिस्तानमध्ये येऊ शकतात. पर्यटनाशी संबंधित स्वच्छता आणि सुरक्षेसंदर्भात सरकारने नवीन उपाययोजना केल्या असून त्याची देशभरामध्ये अंमलबजावणी केली जात आहे. आपल्या उपाययोजनांवर पूर्ण विश्वास असल्यानेच सरकारने पर्यटकांना करोनाचा संसर्ग होणार नसल्याचे म्हटले आहे. योग्य ठिकाणी आवश्यक तितका निधी मदत म्हणूनही दिला जाईल. तुम्हाला उझबेकिस्तानमध्ये पर्यटनादरम्यान करोनाचा संसर्ग झाल्यास आम्ही तुम्हाला मदत करु,” असं सोफिया म्हणाल्या आहेत.

नक्की पाहा >> १७८ दिवसांनंतर सुरु झाली चीनमधील चित्रपटगृहे; दिसून आले ‘हे’ बदल

उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोव यांनी ‘सेफ ट्रॅव्हल गॅरंटीड’ म्हणजेच सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या पर्यटकांसाठीच्या विशेष योजनेची घोषणा मागील आठवड्यात केली. करोनानंतर देशातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी ही योजना अंमलात आणण्यात आली आहे.

परदेशी पर्यटकांना करोनाचा संसर्ग झाल्यास उझबेकिस्तान सरकारडून तीन हजार अमेरिकन डॉलरची मदत केली जाणार असली तरी त्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. पर्यटकांना स्थानिक गाईडच्या मदतीनेच फिरावे लागणार आहे. हे गाईडच त्यांच्या सुरक्षेची आणि स्वच्छेसंदर्भातील कागदोपत्री पुर्तता करतील. सरकारने परवानगी दिल्यानंतर पर्यटकांना हॉटेलमध्ये राहण्याची तसेच भटकंतीची सोय केली जाणार आहे. पर्यटकांनी देशातील नव्या नियमांचे उल्लंघन करु नये म्हणून या परवानग्या असणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

करोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या चीन, जपाना, दक्षिण कोरिया आणि इस्रायलसारख्या देशांमधून उझबेकिस्तानमध्ये येणाऱ्या विमानांना परवानगी देण्यात येणार आहे. मात्र युरोपियन युनियनमधील देश आणि युनायटेड किंग्डममधून येणाऱ्या पर्यटकांना १४ दिवसांच्या सेल्फ आयसोलेशनमध्ये राहिल्यानंतरच भटकंती करता येणार आहे. या देशांमधील करोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानंतर हे नियम शिथिल करण्यात येणार आहेत.

नक्की पाहा हे फोटो >> ‘या’ ज्वालामुखीमधून बाहेर पडतो रात्रीच्या अंधारात चमकणारा निळा लाव्हारस

उझबेकिस्तानने करोनाविरुद्ध यशस्वीपणे लढा दिला आहे. करोनाचे काही रुग्ण आढळून आल्यानंतर तातडीने सर्व विमान सेवा स्थगित करण्यात आल्या. त्यानंतर मार्च महिन्यापासून देशामध्ये कठोर निर्बंध लावून लॉकडाउन करण्यात आला. या सर्वांमुळेच येथील करोनाचा प्रादुर्भाव इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी झाला. सध्या तो आटोक्यात आला आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत उझबेकिस्तानमध्ये करोनामुळे ८४ जणांचा मृत्यू झाला आहे.