16 February 2019

News Flash

Video : ९८ वर्षांच्या आजी सगळ्यात वृद्ध योगा प्रशिक्षक

लहानपणीच योगाचे धडे घेतले होते

कोईंबतूर येथे राहणा-या नानाम्मल यांना देशातील सगळ्यात वृद्ध योगा प्रशिक्षक मानले जाते

योगा केल्याने प्रकृती सुधारते, मन आणि शरिर दोन्ही प्रसन्न राहते. भारताने या योग विद्येचे ज्ञान जगाला दिले आहे, योगाचे महत्त्व आणि फायदे हळूहळू जगाला पटू लागले आहेत त्यामुळे योगा शिकण्याकडे सगळ्यांचा कल वाढत चालला आहे. भारतात ९८ वर्षांच्या योगगुरू आहेत, ज्या आजही ठणठणीत आहेत आणि त्यांच्याकडे योगा शिकायला येणा-या प्रत्येकाला त्या त्याच उत्साहाने योगा शिकवतात. भारतातील सगळ्यात वृद्ध योगा प्रशिक्षक म्हणून त्या ओळखल्या जातात.  त्यांच्या वयाकडे अजिबात पाहू नका, त्यांचा उत्साह आजही तरूण प्रशिक्षकांना लाजवेल असाच आहे.

कोईंबतूर येथे राहणा-या नानाम्मल यांना देशातील सगळ्यात वृद्ध योगा प्रशिक्षक मानले जाते. या वयातही त्या अगदी ठणठणीत आहेत आणि २० पेक्षाही जास्त आसनं त्या अगदी सहजपणे करू शकतात. लहानपणापासून सुरू झालेला योगाचा प्रवास आजही सुरु आहेत. वडिलांकडून त्यांनी योगाचे शिक्षण घेतले. आज त्यांचे देशभरात ६०० हूनही जास्त विद्यार्थी आहेत. पहाटे लवकर उठून त्या मुलांना योगा शिकवायला जातात. योगाबरोबरच कॅल्शिअम आणि फायबर युक्त आहार, फळ आणि मध आणि भरपूर पाणी हे त्यांच्या उत्तम आरोग्याचे रहस्य आहे. फक्त नानाम्मलच नाही तर त्यांच्या कुटुंबातले इतरही सदस्य योगा शिकवतात. या वयात अनेक जण आरोग्याच्या अनेक समस्यांनी ग्रासलेले असतात पण नानाम्मल यांनी या सगळ्यावर मात करून एक नवीन उदाहरण समाजापुढे ठेवले आहे.

First Published on March 10, 2017 9:54 am

Web Title: v nanammal a 98 year old yoga instructor in coimbatore