20 January 2019

News Flash

तरुणींनो….इथे एक दिवसासाठी बॉयफ्रेंड मिळेल

शकूलने इच्छुक तरुणींसाठी चार पॅकेजही दिले आहेत

गुरुग्राममधील २६ वर्षांच्या शकूल गुप्ता या तरुणाने १० फेब्रुवारी रोजी फेसबुकवर एक पोस्ट अपलोड केली आहे.

व्हॅलेंटाइन डेनिमित्त बाजारपेठा सजल्या आहेत… हॉटेल- पबमध्ये ऑफरही दिल्या जात आहेत.. पण व्हॅलेंटाइन डेला तुम्ही सिंगलच आहात आणि तुम्ही एक दिवसासाठी बॉयफ्रेंड शोधत असाल तर तुमच्यासाठी गुरुग्राममधील एका तरुणाने भन्नाट ऑफर आणली आहे. सोशल मीडियावर या तरुणाची पोस्ट व्हायरल होत आहे.

गुरुग्राममधील २६ वर्षांच्या शकूल गुप्ता या तरुणाने १० फेब्रुवारी रोजी फेसबुकवर एक पोस्ट अपलोड केली आहे. तो म्हणतो, व्हॅलेंटाइन डेला मुलींना बॉयफ्रेंड मिळेल. एक दिवसासाठी मी तुमचा प्रियकर असेन’. शकूलने इच्छुक तरुणींसाठी चार पॅकेजही दिले आहेत. यातील पहिल्या पॅकेजमध्ये तो तुमच्या खांद्यावर हात टाकून बसेल. दुसऱ्या पॅकेजमध्ये तो खांद्यावर हात टाकून बसेल, तुमचा हात धरेल, तुम्हाला मिठी देखील मारुन बसेल. तिसऱ्या पॅकेजमध्ये तो या सर्व सुविधांसह किस देखील करणार आहे. तर चौथ्या पॅकेजमध्ये तो ‘काहीही करण्यासाठी तयार’ असल्याचे म्हटले आहे. या पॅकेजेससाठी तो किती पैसे आकारेल हे मात्र त्याने सांगितले नाही. इच्छुकांनी मला संपर्क साधावा, मी पॅकेजच्या दरांविषयी माहिती देईन, असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे. डेटवर तुमच्यासोबत फॅशन आणि सौंदर्यावर गप्पा मारण्यासोबतच झुरळपासून तुमचं रक्षण देखील करणार, असे त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तुम्हाला घरात बसून फक्त जेवायचंय आणि नेटफ्लिक्स बघायचं असेल तर त्यासाठी देखील तयार असल्याचे शकूलच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

विशेष म्हणजे शकूलच्या पोस्टवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी त्यांच्या सिंगल मैत्रिणींना टॅग करत शकूलसोबत डेटवर जाण्याचा सल्लादेखील दिला आहे. बुकिंग करणाऱ्यांना तरुणींसाठी सवलतही दिली जाईल, याशिवाय त्यांना ऑडी कारमधून फुकट फेरफटकाही मारता येईल, असे शकूलने पोस्टमध्ये नमूद केले आहे. शकूलने स्वतःला सॉफ्टओकू. कॉम या संकेतस्थळाचा सीईओ आणि संस्थापक म्हटले आहे. आता शकूलचा ही ‘ऑफर’ कितपत चालेल ही शंकाच असली तरी सोशल मीडियावर त्याच्या या पोस्टची चर्चा मात्र रंगली आहे.

First Published on February 13, 2018 12:49 pm

Web Title: valentines day boyfriend rental gurgaon shakul gupta facebook post viral on social media