पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुलीच्या लग्नाचं आमंत्रण देणाऱ्या वाराणसीच्या रिक्षाचालकाचा आनंद सध्या गगनात मावेनासा झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतल्यामुळे मंगल केवट नावाचे हे रिक्षाचालक सध्या भलतेच आनंदात आहेत.

पंतप्रधान मोदींच्या स्वच्छता अभियानाने प्रेरित होवून मंगल केवट हे स्वतःच गंगा नदीच्या किनारी साफसफाई करत आहेत. मंगल केवट यांनी आपल्या मुलीच्या लग्नाचं पहिलं आमंत्रण पंतप्रधान मोदींनी दिलं होतं. केवट हे स्वतः लग्नपत्रिका दिल्लीमध्ये पीएमओ कार्यालयात देऊन आले होते. त्याची मोदींनी दखल घेत ८ फेब्रुवारी रोजी केवट यांना पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर मंगल केवट आणि त्यांची पत्नी रेनू देवी यांनी पंतप्रधानांच्या वाराणसी दौऱ्यावेळी त्यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.

आणखी वाचा – (स्वस्तात घ्या घर-दुकान! SBI कडून कर्जबुडव्यांच्या प्रॉपर्टीचा लिलाव, तुम्हीही करु शकता खरेदी)

त्यानंतर, अखेर १६ फेब्रुवारी रोजी रविवारी मोदींनी केवट यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या एकदिवसीय दौऱ्यासाठी आले होते. या दौऱ्यात मोदींनी मंगल केवट यांची भेट घेतली. मोदींनी केवट यांच्याकडे त्यांच्या आणि कुटुंबियांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. तसेच, स्वच्छ भारत अभियानात दिलेल्या योगदानाबद्दल मोदींनी केवट यांचं कौतुक केलं.मोदींच्या स्वच्छ भारत अभियानातून प्रेरित होवून मंगल केवट हे स्वतःच गंगा नदीच्या किनारी साफसफाई करत आहेत.