News Flash

Viral Video : ‘ती’ चं मन श्रीमंत होतं, दुकान सांभाळत मोराला भरवणारी भाजीवाली ठरतेय चर्चेचा विषय

सोशल मीडियावर नेटकऱ्यांचीही व्हिडीओला पसंती

माणूस आणि प्राणी यांच्यातल्या संघर्षाच्या अनेक कहाण्या आतापर्यंत आपण पाहिल्या असतील, वाचल्या असतील. पण या जगात अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे माणूस स्वतःच्या परिस्थितीचा विचार न करता मुक्या प्राण्यासाठी धावून आलेला पहायला मिळाला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे, ज्यात एक भाजीवाली आपला नेहमीचा धंदा सांभाळत मोराला खायला घालताना दिसत आहे.

टिंकू वेंकटेश या युजरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. काही नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा व्हिडीओ राजस्थान भागातला आहे. ज्यात भाजी विकणारी ही महिला आपलं नेहमीचं काम सांभाळून या मोराला भरवताना दिसत आहे.

सोशल मीडियावर या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून या व्हिडीओला लाखो व्ह्यू मिळाले आहेत. जाणून घेऊयात नेटकऱ्यांच्या काही निवडक प्रतिक्रीया…

माणसाने अशात पद्धतीने मुक्या प्राण्यांना सहारा द्यायला हवा, यातून निसर्गचक्राचा समतोल कायम राहिलं अशी भावना अनेक नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 4:23 pm

Web Title: vegetable vendor feeds a peacock with her hand heartwarming video goes viral psd 91
Next Stories
1 Viral Video : साळिंदरच्या एका फटक्यानं बिबट्याने ठोकली धूम
2 सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल ठरतायत सोशल मीडियावर चर्चेचा विषय, जाणून घ्या कारण…
3 Video : टेरेसवर टेनिस खेळत झाल्या होत्या व्हायरल, फेडररने दिलं सरप्राईज गिफ्ट
Just Now!
X