News Flash

धाकड गर्ल बबिता म्हणते; हॅलो फ्रेंडस, दूध पी लो

तिच्या या व्हिडियोला दिवसभरात ३० हजारच्या घरात व्ह्यूव मिळाले आहेत. तर ८ हजारहून अधिक लाईक्स मिळाले असून अनेकांनी हा व्हिडियो रिट्विटही केला आहे.

सोशल मीडियावर दर काही दिवसांनी वेगवेगळे व्हिडियो व्हायरल होत असतात. नुकताच असाच एक व्हिडियो व्हायरल झाला अशून त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. कुस्तीपटू बबिता फोगट हिने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडियो शेअर केला असून त्यामध्ये ती स्वत: म्हशीचे दूध काढताना दिसत आहे. तिच्या या पोस्टला लोकांनी मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअरही केले आहे. यामध्ये तिने हॅलो फ्रेंडस भैंस का दूध पिलो असे लिहीत ट्विट केले आहे. याआधी काही दिवसांपूर्वी हाय फ्रेंडस, चाय पी लो असा एक व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर आता अवघ्या ६ सेकंदांचा असलेला बबिताचा हा व्हिडियोही नेटीझन्सची पसंती मिळवत आहे. गुलाबी रंगाचा टीशर्ट घातलेली बबिता यामध्ये अतिशय सराईतपणे म्हशीचे दूध काढताना दिसत आहे. तिच्या या व्हिडियोला दिवसभरात ३० हजारच्या घरात व्ह्यूव मिळाले आहेत. तर ८ हजारहून अधिक लाईक्स मिळाले असून अनेकांनी हा व्हिडियो रिट्विटही केला आहे.

२८ वर्षीय बबिता पैलवान महावीर सिंह फोगट यांची मुलगी आहे. तिची सख्खी बहीण गीता, संगिता, ऋतू आणि विनेश याही तिच्य़ा बहीणी आहेत. बबिताने २१ व्या कॉमनवेल्थमध्ये महिलांच्या फ्रीस्टाईल विभागात रौप्य पदक जिंकले होते. याआधीही तिने भारतासाठी अनेक स्पर्धा खेळल्या असून त्यात चांगली कामगिरी केली आहे. बबिता ट्विटरवर नेहमीच अॅक्टीव्ह असते. याआधीही तिने आपल्या भाचीचा एक व्हिडियो शेअर केलेला. त्यालाही नेटीझन्सकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये ६ ते ७ वर्षाची मुलगी १० ते १२ वर्षाच्या मुलाशी कुस्ती खेळत असल्याचे दिसले होते. दंगल या बॉक्सऑफीसवर हिट झालेल्या चित्रपटामुळे गीता आणि बबिता या भगिनींना सामान्यांपर्यंत पोहोचवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2018 8:42 pm

Web Title: video dangal girl babita phogat said hello friends have buffalos milk
Next Stories
1 #RanveerDeepikaWedding : तारीख ठरली अन् मीम्सची सुपारी फुटली
2 5 दिवसांच्या सेलमुळे मालामाल झाले फ्लिपकार्ट, अॅमेझॉन ; कमावले ‘इतके’ कोटी रुपये
3 Hero ची नवी स्कुटर Destini 125 भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि खासियत
Just Now!
X