चौफेर पसरलेला बर्फ. रक्त गोठवणारी थंडी, निसर्गाच्या आव्हानांचा सामना करत प्रतिकूल परिस्थिती देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांचा ख्रिसमस साजरा करतानाचा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

जगभरात आज ख्रिसमस साजरा केला जात आहे. सगळीकडेच आनंदाच वातावरण असून, जम्मू काश्मीरमधील सीमेवर कर्तव्यावर असलेल्या भारतीय जवानानींही ख्रिसमस साजरा केला. याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात काही जवान सांताक्लॉजची वेशभूषा केलेली दिसत आहेत. विशेष म्हणजे एक चर्चही जवानांनी तयार करून सजवला आहे. यात सगळे जवान जिंगल बेल हे गाणे म्हणत आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी होत आहे. सगळीकडं फक्त बर्फच दिसत असून त्यामुळे उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. अशा वातावरणात सीमेवर असलेल्या जवानांना असंख्य अडचणींना सामना करावा लागतो.