News Flash

VIDEO : आजकल पाँव जमीं पर नहीं रहते मेरे, वेडिंग फोटोग्राफरचा अॅडव्हेंचरस क्लिक

लग्नाच्या पारंपरिक सोहळ्यातील क्षण मोठ्या कलात्मक पद्धतीने टीपण्यासाठी वेडिंग फोटोग्राफर्स प्रयत्नशील असतात.

छाया सौजन्य- ट्विटर

लग्न म्हटलं की मांडवापासून ते पाहुण्यांच्या यादीपर्यंत बऱ्याच गोष्टींचा घाट घालण्यात येतो. यामध्ये आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीवर अनेकांचं जातीने लक्ष असतं. ते म्हणजे लग्नसोहळ्यामधले काही सुरेख क्षण टीपण्यासाठी निवड केला जाणारा / जाणारी फोटोग्राफर. लग्न एकदाच होतं, असं म्हणत गेल्या काही वर्षांमध्ये वेडिंग फोटोग्राफर्सना अनेकांचीच पसंती असल्याचं पाहायला मिळालं. लग्नाच्या पारंपरिक सोहळ्यातील आठवणी मोठ्या कलात्मक पद्धतीने टीपण्यासाठी वेडिंग फोटोग्राफर्स प्रयत्नशील असतात.

लग्नातील प्रत्येक विधी किंवा मग काही सुरेख क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी फोटोग्राफर्स बरेच जुगाड करतात. इथे जुगाड म्हणण्याचं कारण की, फोटो पाहता जितका सुरेख दिसतो तितकीच त्यामागची कल्पकतासुद्धा प्रशंसनीय असते. पण, फोटोसाठी विविध अँगल्स शोधणाऱ्या फोटोग्राफर्सचं हटके रुप तुम्ही पाहिलंय का? नसेल पाहिलं, तर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओतून तुम्हाला याचा अंदाज येऊ शकतोय.

नववधू आणि वराचा सुरेख फोटो टीपण्यासाठी केरळचा एक वेडिंग फोटोग्राफर थेट झाडावर उलटा लटकला होता. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. एक फोटो काढण्यासाठी त्या फोटोग्राफरचा खटाटोप पाहता आजकल पाँव जमीं पर नही रहते मेरे.. अशीच प्रतिक्रिया उत्स्फूर्तपणे द्यावीशी वाटते. मुख्य म्हणजे सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता फक्त आणि फक्त फोटो टीपण्यासाठी म्हणून त्याने हा धोका पत्करला. झाडावर उलटं लटकत त्याने वर-वधूचा फोटो काढला आणि त्यानंतर नवरदेवाच्या हातात कॅमेरा देत तो झाडावरुन खाली उतरला. सोशल मीडियावर या अॅडव्हेंचरस क्लिकच्या आणि तो टीपणाऱ्या त्या फोटोग्राफरच्याच चर्चा सुरु असून, अनेकांनीच त्याच्या कौशल्याला दाद दिली आहे.

वाचा : बलात्कार हा बलात्कार असतो त्यावरुन राजकारण करु नका – नरेंद्र मोदी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 2:46 pm

Web Title: video kerala photographer hangs upside down from a tree to get the perfect shot of newly married couple
Next Stories
1 कोट्यवधींची संपत्ती, व्यवसाय लाथाडून २४ वर्षीय CA झाला जैन साधू
2 ‘या’ रेसिपीमुळे सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर सोशल मीडिया ट्रोलिंगचा शिकार
3 चर्चा तर होणारच ! चहा विकून उभी केली ३३९ कोटींची संपत्ती
Just Now!
X