News Flash

Video…आणि चक्क सिंहच मांजरीला घाबरला !

मजेशीर घटना कॅमेरात कैद

लहानपणी जंगलातील प्राण्यांच्या गोष्टी ऐकताना आपल्याला प्राण्यांची ओळख होते. त्याचवेळी आई-वडिल, आजी-आजोबा, शिक्षक यांच्याकडून त्या प्राण्यांचे फोटो दाखवत त्यांची वैशिष्ट्येही सांगितली जातात. जंगलाचा राजा सिंहाच्या तर आपण कित्येक गोष्टी ऐकल्या असतील. राजा म्हणजे शक्तीशाली, बलवान असाच. त्यामुळे त्याचा जंगलात असणारा दबदबा आणि वर्चस्व याचे वर्णनही आपण ऐकलेले असते.

मात्र मांजरी कोणालाच घाबरत नाही हेही आपण ऐकलेले आहे. हेच एका मांजरीने नुकतेच दाखवून दिले. जंगलाचा राजाही जिला घाबरतो अशा सिंहीणीला तिने आव्हान दिले. हा व्हिडिओ डेरेक क्रॉन यांनी यू ट्युबवर अपलोड केला आहे. यामध्ये एका सिंहीणीला मांजर आव्हान देत असल्याचे दिसत आहे. ही सिंहीण अमेरिकेच्या टेक्सासमधील द सेंटर फॉर अॅनिमल रिसर्च अॅंड एज्युकेशन संस्थेतील आहे. पिंजऱ्यांच्या बाहेर असणारी काळ्या-पांढऱ्या रंगाची ही लहानशी मांजर या सिंहीणीला घाबरवत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सिंहिणीला मांजरीशी खेळायचे असल्याचे दिसत आहे. मात्र मांजर सिंहिणीला त्रास देण्याच्या मूडमध्ये असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर भलताच व्हायरल होत असून एका दिवसात हा व्हिडिओ ५० हजार जणांनी पाहिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 11:00 am

Web Title: video lion got scared of cat america
Next Stories
1 भारतीय वंशाचा अमेरिकन तरुण बनला अब्जाधीश
2 दमलेल्या आईची काळजी घेणाऱ्या मुलाचा हृद्यस्पर्शी फोटो व्हायरल
3 Viral Video : लाट आली धावून अन् रिपोर्टर गेला वाहून
Just Now!
X