News Flash

Video : …आणि ‘त्या’ अवस्थेत कुत्र्याच्या पिल्लाला पाहून मालक घाबरला

मालकाचा आवाजही झाला कापरा

माणूसच नाही तर पाळीव प्राणीही अनेकदा आपल्या मालकाला घाबरवू शकतात. आता ते कसं काय तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला लक्षात येईल की पाळीव प्राण्यांना सांभाळणं म्हणावं तितकं सोपं नसतं. त्यातही सोशल मीडियावर सध्या कोणतीही गोष्ट वेगाने व्हायरल होते. असाच एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे आणि त्यामुळे या मालकाचे धाबेच दणाणले आहे.

या कुत्र्याच्या पिल्लाने आपल्या तोंडात किचनमधील सुरी धरल्याचे आपल्याला दिसत आहे. आता कुत्र्याने अशाप्रकारे सुरी तोंडात घेतल्याने त्याचा मालक आणि आजूबाजूचे सगळेच भलतेच घाबरुन गेले. ही सुरी त्याने खाली टाकावी यासाठी बरेच प्रयत्नही सगळे जण करत असल्याचे पाहायला मिळते. आता अशाप्रकारे सुरी तोंडात घेणे कितपत घातक ठरु शकते हे कदाचित या कुत्र्याच्या पिल्लाला समजत नसेल. मात्र त्यामुळे होणारी दुर्घटना काय असू शकते हे वेगळे सांगायला नको.

त्यातही या तोंडात सुरी धरलेल्या पिल्लासमोर आणखी एक कुत्रे असल्याने कुत्र्याचा मालक जास्तच घाबरला असल्याचे व्हिडिओतील त्याच्या आवाजावरुन आपल्या लक्षात येते. सुरी दे, असे सांगताना त्या मालकाचा आवाज अक्षरशः थरथरत आहे. अखेर काही वेळाने हे पिल्लू सुरी खाली टाकते आणि सगळ्यांचाच जीव भांड्यात पडतो. मात्र काही वेळासाठी वातावरण अतिशय गंभीर झाल्याचे दिसते. हा व्हिडिओ मिच थरमन याने यु-ट्यूबवर अपलोड केला आहे. यामध्ये चार्ली नावाच्या कुत्र्याच्या पिल्लाने तोंडात सुरी धरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2017 2:41 pm

Web Title: video little puppy holding knife in mouth owner got scared
Next Stories
1 स्वतंत्र भारताचा पहिला मतदार वयाच्या शंभरीत पुन्हा बजावणार मतदानाचा हक्क
2 Video : अन् मोबाईलनं खिशातच पेट घेतला
3 परदेशात वाढलेल्या महिलेनं ‘अशी’ जपली भारतीय संस्कृती
Just Now!
X