News Flash

VIDEO: इन्स्टाग्रामसाठी काहीही! सोशल मीडियावरील पोस्टसाठी त्यानं बोटीतून उडी मारली आणि…

हा व्हिडीओ सध्या मीडियावर व्हायरल झाला आहे

जहाजामधून थेट समुद्रात उडी मारली

इन्स्टाग्रामवरील आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी एका तरुणाने आपला जीव धोक्यात घातल्याची घटना समोर आली आहे. आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी नीक न्यादेव या तरुणाने एका जहाजामधून थेट समुद्रात उडी मारली. त्याने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवर पोस्ट केला आहे. मात्र या स्टंटबाजीनंतर नीकवर कंपनीने जहाज कंपनीने आजीवन प्रवेशबंदीची कारवाई केली आहे. त्यामुळे यापुढे नीकला रॉयल कॅरेबियन जहाजांमधून प्रवास करता येणार नाही.

नीकने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तो एका मोठ्या क्रूझच्या कठड्यावर उभा असलेला दिसतो आणि पुढल्या क्षणी तो समुद्रामध्ये उडी मारतो. ‘सिंफनी ऑफ द सीज’ या क्रूझमधून जाताना त्याने हा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर १ लाख ५७ हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले असून तो सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी नीकला कमेन्टमधून तुला लागलं तर नाही ना अशी चौकशी केली आहे. या कमेन्टला त्याने उत्तर देताना ‘मला उडी मारल्यानंतर थोडी दुखापत झाली, अशी माहिती नीकने दिली आहे. ‘माझ्या पायांना काहीच झाले नाही मात्र माझ्या मानाले आणि मानेजवळच्या हाडाला थोडी दुखापत झाली आहे’, अशी कमेन्ट नीकने या व्हिडीओवर केली आहे.

 

View this post on Instagram

 

Full send

A post shared by Nick Naydev (@naydev91) on

अनेकांनी या व्हिडीओवर कमेन्ट करुन नीकला चांगलेच सुनावलेही आहे. ‘एकीकडे अपंगांबद्दल देव अन्याय करतो आणि दुसरीकडे तुझ्यासारखे लोक अशाप्रकारची स्टंटबाजी करुन जीवाशी खेळतात, आयुष्य फुकट घालवतात. पण देवाचे आभार आहेत तू जिंवत आहेस. पण खरचं तू बुडून मरायला हवं होतं’, असं मत एकाने या व्हिडीओवर कमेन्ट करुन व्यक्त केले आङे.

अशाप्रकारे इन्स्टाग्रामवरील व्ह्यूज आणि लाईक्ससाठी जीव धोक्यात टाकण्याची ही पहिलीच घटना नाही. दरवर्षी सोशल नेटवर्किंगवरील फोटोसाठी तरुणांनी जीव धोक्यात टाकल्याच्या बातम्या येतात. अशाप्रकारे स्टंटबाजी करुन इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करणारा न्यू यॉर्कमधील जॅक्सन कोऐ हा २५ वर्षीय तरुण एका इमारतीच्या मागील बाजूस मृत अवस्थेत सापडला होता. अशाप्रकारे सोशल मिडियावर व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी जीव धोक्यात टाकू नये यासाठी जगभरातील पोलीस खाती सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जनजागृती करताना दिसतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 2:41 pm

Web Title: video man jumps off royal caribbean cruise to post on social media instagram
Next Stories
1 Kumbh Mela 2019 : उपग्रहातून असा दिसतो कुंभमेळा, इस्रोने जारी केले छायाचित्र
2 विद्यार्थ्यांच्या मेंदूचे निरीक्षण करणार ‘हेडबँण्ड’
3 10YearChallenge : धोनीच्या षटकाराला आयसीसीचा सलाम
Just Now!
X