जगात ख-या मैत्रीची आपण अनेक उदाहरणे पाहिलीत आहेत. त्यातच प्राणी आणि मनुष्य यांची मैत्री तर पुर्वापार चालत आलेली आहे. प्राणी हा मनुष्याचा सच्चा मित्र असल्याचे मानले जाते. माणसाच्या प्रत्येक सुखदु:खात प्राणी माणसाला साथ देतात. त्याचप्रमाणे त्याच्यावर भरभरून प्रेमही करतात. एखाद्या लहान मुलाला सांभाळावं अशी मुक्या जनावराची काळजी घेतली तर तो मुका जीवही तुमच्यावर तेवढंच प्रेम करुन तुमची प्रत्येक गोष्ट ऐकतो. याच मैत्रीचं एक उदाहरण सध्या चांगलंच गाजत आहे. एक हत्ती आणि त्याच्या मालकाच्या एका व्हिडिओने सध्या इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओला कमी कालावधीत अनेक व्ह्युज मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

रेने कॅस्ली या व्यक्तीने त्याच्या हत्तीबरोबरचा एक व्हिडिओ शेअर केल्या असून रेने हत्तीच्या पाठीवर काही प्रात्याक्षिके करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा हत्ती आपल्या मालकाला म्हणजेचे रेनेला या कार्यात मदत करत आहे. हे प्रात्याक्षिक म्हणजे त्यांचा ट्रेनिंगचा एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

1 or 2 ?

A post shared by Rene Kaselowsky | Official (@rene_casselly) on

जोरदार चर्चेत असलेल्या या व्हिडिओमध्ये हत्ती आपल्या सोंडेच्या मदतीने आपल्या मालकाला उंच हवेत फेकतो त्यानंतर रेने हत्तीच्या पाठीवर प्रात्याक्षिके करेपर्यंत हत्तीदेखील स्थिर उभा राहतो. एवढंच नाही तर पुढे रेनेची प्रात्याक्षिके झाल्यावर हत्ती एक पाय वर उचलून तीन पायांवर स्थिर उभा राहिल्याचे दिसून येत आहे.

रेनेची प्रत्याक्षिके पूर्ण होईपर्यंत हत्ती स्थिर राहिल्यामुळे त्याच्यातील संयमता आणि रेनेला सांभाळून घेण्याची कसब यादोघांचही यावेळी दर्शन झाले. त्याच्या याच संयमशीलतेमुळे सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकांचा पाऊस पडत आहे.