एक जाहिरात समाजाचा दृष्टीकोन किती बदलू शकते याची अनेक उदाहरणे तुम्ही पाहिली असतील. सध्या असाच एक व्हिडिओ माहिला वर्गात चर्चेचा विषय बनत आहे. बॉडीफोर्म या सॅनेटरी पॅड उत्पादक कंपनीने व्हिडिओ बनवला आहे.

मासिक पाळीच्या वेळी महिलेला धावू नका, उड्या मारू नका नाहितर अधिक रक्तस्त्राव होईल अशा अनेक सुचना दिल्या जातात. पण मासिक पाळीबद्दलचे असे अनेक गैरसमज या व्हिडिओमार्फत दूर करण्याचा प्रयत्न  केला आहे.

खेळताना अनेक महिला खेडाळूंना दुखापत होते अशा वेळी रक्त येते तेव्हा त्या माघार घेतात का? मग मासिक पाळीच्या वेळी तिच्यावर बंधने का? असा सवाल यातून विचारला आहे.

व्हिडिओमध्ये  विविध खेळ खेळणा-या अनेक महिला दाखवण्यात आल्या आहेत, यात प्रत्येकवेळी ती पडते, तिला दुखापत होते, रक्त येते पण ती माघार घेत नाही मग मासिक पाळीसारखी एकच गोष्ट तिला का माघार घ्यायला लावते असा सवाल करत काही गैरसमजूतीमुळे स्व:तला रोखू नका असा संदेश यातून दिला आहे.