जंगलाचा साधा, सोपा आणि सरळ नियम आहे. बळी तो कान पिळी. इथे दुबळा जिवंतच राहू शकत नाही. तेव्हा जर जंगलात जिवंत राहायचं असेल तर इथल्या प्रत्येक प्राण्याला संघर्ष करावाच लागतो. मग तो जंगलाचा राजा सिंह असो की घात लावून बसलेली मगर असो आणि या संघर्षात जो ताकदवान तोच शेवटपर्यंत आपलं अस्तित्त्व टिकवून ठेवू शकतो. जंगलात नेहमीच ताकदवान प्राणी दुबळ्यांची शिकार करताना अनेकदा दिसतात. पण तितक्याच ताकदीचे दोन प्राणी एकमेकांसोबत लढताना क्वचितच पाहायला मिळतात. पण जेव्हा दोन तुल्यबळ शिकारी एकत्र येतात तेव्हा त्यातल्या एकाच मृत्यू तर अटळ असतोच. असंच मगर आणि दोन सिंहांचं द्वंद्व युद्ध एका जंगलात पाहायला मिळालं.

नदीपलीकडे या दोन सिंहांना जायचं होतं अर्थात त्यासाठी नदी ओलांडणं भाग होतं. आता जंगलाचे राजे ते त्यांना कोण अडवणार म्हणा? त्यांच्या वाटेत जो कोणी येईल त्यांचा फडशा पाडतील ते. पण कितीही झालं तरी त्यांची दहशत नदीतल्या मगरीला कुठली घाबरवतेय. सिंह जरी जंगलाचा राजा असला तरी नदीकाठी मात्र मगरीची दहशत. तेव्हा तिच्या राज्यातून जायचं म्हणजे या सिंहांना त्याची किंमत चुकवावी लागणारचं ना! या दोन सिंहांना पाण्यात शिरताना पाहून घात लावून बसलेल्या मगरीने दोघांवरही हल्ला चढवला आणि पाण्यातच रंगले मगर आणि सिंहांचे युद्ध. आता यात नेमके जिंकले कोण हे पाहण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा लागेल.

आता हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर मगर आणि सिंहांच्या युद्धात सिंह मरण पावेल, असं तुम्हाला वाटत असेल तर मग हा दुसरा व्हिडिओ  पाहा.

काय मग या युद्धात कोण जिंकलं कळलं ना तुम्हाला? तुम्ही अगदी बरोबर ओळखलं! या झटापटीतून दोन्ही सिंहांनी अगदी सुखरूप आपली सुटका करून घेतली, त्यातल्या एकाने तर पलिकडचा किनाराही गाठला. शेवटी जंगलाचा राजा तो शत्रू समोर नांगी थोडीच टाकणार!