गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. भक्तांसमोरच महिलांना अश्लिलपणे स्पर्श करणाऱ्या या ढोंगी बाबाचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक महिला या ढोंगी बाबाच्या पाया पडत आशिर्वाद मागत असल्याचं दिसत आहे. धक्कादायक म्हणजे आशिर्वाद दिल्यानंतर हा बाबा निर्धास्तपणे महिलेला कमरेच्या खाली स्पर्श करताना दिसत आहे. त्यातही विशेष म्हणजे यावर ना ती महिला आक्षेप घेते, ना तिथे उपस्थित कोणी भक्त घेतो.

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा हा बाबा महिलेसोबत अश्लिल कृत्य करत होता तेव्हा तिथेच उपस्थित एका व्यक्तीने मोबाइलवर हा व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी ढोंगी बाबाच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली असून अश्लिल कृत्यावर संताप व्यक्त केला आहे.

This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
man opts for papaya over cake on birthday
व्यक्तीने वाढदिवशी केकऐवजी कापली पपई, पण का? नेटकऱ्यांना पडला प्रश्न, व्हिडीओ तुफान व्हायरल
a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”
Love Jihad
व्हायरल होत असलेला लव्ह जिहादचा तो व्हिडीओ…

सोशल मीडियावर लोक ढोंगी बाबाच्या या कृत्याचा निषेध व्यक्त करत आहेत. दरम्यान हा बाबा कोण आहे ? तसंच व्हिडीओ कुठचा आहे ? यासंबंधी कोणती माहिती मिळू शकलेली नाही.

आपल्या देशात अशा ढोंगी बाबांची कमतरता अजिबात कमतरता नाही आहे. असे अनेक ढोंगी बाबा समोर आले आहेत ज्यांच्यावर बलात्कार, लैंगिक शोषण आणि महिलांसोबत अश्लिल कृत्य केल्याचा आरोप आहे. यातील अनेकांची तुरुंगात रवानगी झाली आहे तर काही फरार आहेत. यामध्ये आसाराम बापू, राम रहीम, आशू महाराज, दांती महाराज अशी काही नवी आहेत.