तुम्ही कधी कुत्रा आणि मांजरीला एकत्र बसून आराम करताना बघितलंय…? आता तुम्ही विचार करत असाल हे कसं शक्य आहे, कारण दोघंही एकमेकाचे ‘जानी दुश्मन’…पण हुडहुडी भरवणाऱ्या थंडीमुळे हे शक्य झालंय. सोशल मीडियामध्ये असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.
इंडियन फॉरेस्ट ऑफिसर सुशांत नंदा यांनी कुत्रा आणि मांजरीच्या पिल्लांचा हा गोड व्हिडिओ शेअर केलाय. गारठवणाऱ्या थंडीमध्ये स्वतःला उब मिळावी यासाठी कुत्र्याचं आणि मांजरीचं पिल्लू एकमेकांशेजारी बसून शेक घेताना या व्हिडिओत दिसत आहेत.
Warming themselves and our heart pic.twitter.com/dzoNZ09twx
— Susanta Nanda IFS (@susantananda3) January 8, 2021
आणखी वाचा- भारतीय रेस्तराँ मालकाने अंतराळात पाठवला समोसा…फ्रान्समध्ये झालं क्रॅश लँण्डिंग…बघा Video
१५ सेकंदांचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडला असून आतापर्यंत 5 लाखांपेक्षा जास्त जणांनी हा व्हिडिओ पाहिलाय, तर 10 हजारांपेक्षा जास्त लाइक व हजाराहून जास्त रिट्विट झालाय, सोबतच नेटकरी मजेशीर रिएक्शन्सही देत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2021 9:57 am