टीम इंडियाचा दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना १३ जानेवारी रोजी सेंचुरियन येथे रंगणार आहे. या सामान्याआधी भारतीय संघानं नेटवर चांगलाच सराव केला. भारतीय संघाच्या वॉर्म अॅप सेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर गाजतोय.

भारतीय संघाचे फिटनेस ट्रेनर शंकर बसु यांनी खेळाडूंसाठी सुपरस्पोर्ट पार्कमध्ये वॉर्मअॅप सेशन ठेवलं होतं, आणि या सेशनमध्ये खेळाडूंनी खूपच मज्जामस्ती केली. या सेशनमध्ये प्रत्येक खेळाडूंना एक टीशर्ट देण्यात आलं होतं. हे टीशर्ट खेळांडूना पाठीमागे अडकवायचं होतं. खेळ सुरू झाल्यानंतर खेळांडूनी इतर खेळाडूंच्या मागे अडकवलेले टीशर्ट पळवायचे होते. या सेशनमध्ये सर रवींद्र जडेजाला सर्वाधिक टीशर्ट पळवण्यात यश आलं.

केप टाऊनमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा ७२ धावांनी पराभव झाला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या टीमला पराभुत करण्यासाठी भारतीय संघानं चांगलीच कंबर कसली आहे.