28 February 2021

News Flash

गोविंदा स्टाईल डान्स करुन धमाल उडवणाऱ्या काकांची ओळख पटली, दुसरा व्हिडीओही आला समोर

व्हिडीओत व्हायरल झालेल्या काकांचं नाव संजीव श्रीवास्तव असं आहे. त्यांना डब्बू अंकल नावानेही ओळखलं जातं

सोशल मीडियावर सध्या एक काका सुपरस्टार झाले आहेत. गोविंदाच्या गाण्यावर त्यांनी केलेला अफलातून डान्स पाहून अनेकजण त्यांचे चाहते झाले आहेत. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवर त्यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेकजण शेअर करत आहेत. अनेकांना त्यांचा हा डान्स प्रचंड आवडला असून त्यांचा तरुणांना लाजवेल असा उत्साह पाहून अनेकजण फिदा झाले आहेत.

काकांचा हा व्हिडीओ ३० मे रोजी व्हायरल झाला होता. ३६ सेकंदाच्या या व्हिडीओ क्लिपमध्ये ते एका स्टेजवर नाचताना दिसत आहेत. गोविंदाच्या ‘खुदगर्ज’ चित्रपटातील ‘आप के आ जाने से’ गाण्यावर एकदम गोविंदा स्टाइलमध्ये ते थिरकत आहेत.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याच कार्यक्रमातील अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ते त्या काकांची ओळख पटली, दुसरा व्हिडीओही आला समोर ‘चढती जवानी मेरी’ गाण्यावर ठुमके लावताना दिसत आहेत.

व्हिडीओत व्हायरल झालेल्या काकांचं नाव संजीव श्रीवास्तव असं आहे. त्यांना डब्बू अंकल नावानेही ओळखलं जातं. मध्यप्रदेशच्या विदिशाचे ते रहिवासी आहेत. मिथून आणि गोविंदा यांचा डान्स त्यांनी प्रचंड आवडतो. १२ मे रोजी आपल्या मेव्हण्याच्या लग्नातील कार्यक्रमात त्यांनी हा डान्स केला होता. त्यांना स्टेजवर बोलावण्यात आलं होतं. स्टेजवर येताच त्यांचा डान्स पाहून उपस्थितही त्यांच्यात सहभागी झाले. आपला व्हिडीओ व्हायरल झाल्याचं त्यांना माहितही नव्हतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 4:24 pm

Web Title: video of man dancing on govindas song went viral
Next Stories
1 जाणून घ्या ‘दख्खनच्या राणी’बद्दल ५ रंजक गोष्टी
2 प्रतिष्ठित ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेवर पुन्हा एकदा भारतीय मोहोर!
3 Video : विदेशी असूनही भारतीय भाषेचा अभिमान, मग आपल्याला का नाही?
Just Now!
X