22 February 2020

News Flash

Video: एक विमान टेकऑफच्या तयारीत असताना दुसरे लॅण्डिंगसाठी उतरु लागले अन्…

काळजाचा ठोका चुकवणारा या व्हिडिओला साडेपाच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Video

इंटरनेटवर सतत वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या इंटरनेटवर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून या ५२ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये एकाच वेळी एकाच रन-वेवर एक विमान उतरताना तर दुसरे टेकऑफ घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एकाच फ्रेममध्ये दोन विमाने दिसत आहे. रन-वेच्या पुढील भागात अगदी मध्यरेषेवर उभं राहून शूट केलेल्या या व्हिडिओत एक विमान लॅण्ड करताना दिसत आहे. मात्र त्याच वेळी रन-वेवरुन एक विमान आकाशात झेपावण्याच्या तयारीत उभं आहे. आकाशातील विमान लॅण्ड होण्यासाठी रन-वेच्या दिशेने उतरु लागते तसे रन-वेवरील विमान टेकऑफसाठी धावायला सुरुवात करतं. अगदी काही सेकंदाच्या फरकाने हवेतील विमान लॅण्ड करते अन् रन-वेवरील विमान टेकऑफ घेताना दिसते. तीन दिवसापूर्वी पोस्ट केलेल्या या व्हिडिओला साडेपाच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हा व्हिडिओ हृदयाची धडधड वाढवणार असल्याचे मत अनेकांनी ट्विटवरुन व्यक्त केलं आहे. काहींनी गरज नसताना धोका पत्करल्याचं म्हटलं आहे तर काहींनी एअर ट्रॅफिक कंट्रोलरचे कौतुक केलं आहे.

गरज नसताना

…म्हणून हे गरजेच

हे खरं असेल तर

मला आता समजलं की…

हे असं करणं टाळावं

…म्हणून एक तास लवकर यावं

वैमानिकाचं काय?

नेटकऱ्यांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी व्हिडिओ पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकल्याचे प्रतिक्रियांमधून दिसून येत आहे.

First Published on February 12, 2020 9:34 am

Web Title: video of planes landing and taking off simultaneously on same runway is making netizens anxious scsg 91
Next Stories
1 ऐतिहासिक विजयानंतर केजरीवाल आणि कुणाल कामराचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
2 दोन लाख पणत्यांद्वारे साकारली श्रीरामाची प्रतिमा; कलाकाराने रचला जागतिक विक्रम
3 22 वर्षांनंतरही ‘ती’ लहान मुलीसारखी दिसायची, केली आत्महत्या