तुम्ही शाळेत जायला किती प्रवास केलाय? अर्धा तास? एक तास?

किती किलोमीटर प्रवास केलाय? २ किलोमीटर? १० किलोमीटर?

Pimpri, Kiwale, pimpri mnc,
पिंपरी : किवळेतील दुर्घटनेनंतर पालिकेला जाग; होर्डिंगधारकांना दिला ‘हा’ इशारा
Dried pods of opium, Dhule, opium Dhule,
धुळे : लसूण भरलेल्या मालमोटारीत हे काय… पोलीसही चकित
Police Raid, Spa Centers, Hinjewadi, Wakad, sex racket, Rescue Eight Women, crime in Hinjewadi, crime in Wakad, crime in chinchwad, crime in pimpri, sex racket, prostitute, police raid on spa,
पिंपरी : आयटी हिंजवडी आणि उच्चभ्रू वाकडमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; आठ महिलांची सुटका
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प

आजच्या तरूणांनी नसेल पण त्यांच्या आईवडीलांनी किंवा आजीआजोबांपैकी कोणीतरी नक्कीच असा भयानक प्रवास केलेला असेल. हे एवढं अंतर कापून शाळेत जावं लागत होतं, अशा गोष्टी आपण कोणाकडून तरी एेकलेल्या असतातच.

पण काहीही असलं तरी सहा वर्षांच्या मुलांना रोज शाळेत जाण्यासाठी उभा डोंगर चढून जावं लागणं हे फारच झालं. आणि हा डोंगर चढणं म्हणजे फक्त चालत जाणं नाही तर उभा कडा चढून जाणं. चीनमधल्या एका गावात खड्या डोंगराच्या माथ्यावरच्या शाळेत जाण्यासाठी सहा वर्षांच्या लहान मुलांना हा कडा चढून जावं लागत होतं. आता सहा वर्षांची मुलं डोंगर चढत आहेत म्हटल्यावर त्यांच्या सुरक्षेचे काही  उपाय असतील अशी अपेक्षा करता येते. पण या ठिकाणी तेही नव्हतं.

कितीतरी वर्षं ही मुलं त्यांचं दप्तर पाठीवर घेत स्वत: हा कडा चढून जात होती. यासाठी त्यांच्याकडे दोऱ्याही नव्हत्या. डोंगरकड्यावर उगवलेल्या वेलींना धरत ही मुलं रोज या शाळेत जायची .

सौजन्य- यूट्यूब

या मुलांची ही भयानक परिस्थिती चीनच्या सरकारी माध्यमांनी दाखवल्यावर सगळीकडे हळहळ व्यक्त झाली. ही परिस्थिती बदलण्यासाठी चीनमधल्या जनतेने दीड लाख डाॅलर्स गोळा केले आणि या डोंगरकड्यावर लोखंडी शिड्या लावल्या. रोजच्या रोज वेलींना पकडून डोंगर चढताना या लहानग्यांचा जीव कमालीचा धोक्यात येत होता. पण आता या लोखंडी शिड्यांच्या साहाय्याने ही मुलं सुरक्षितपणे हा डोंगर चढून जातात

पण भाऊ, हे सगळं करण्यापेक्षा त्या दीड लाख डाॅलर्समध्ये डोंगराच्या पायथ्याशी एक नवी शाळा बांधली असती मुलांचे  हेलपाटे वाचलं असते की नाही? सगळा कारभारच चायनीज्!