आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध असलेल्या गुजरातमधील गिर अभयारण्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही तरुणांनी सिंहिणीच्या शिकारीचा व्हिडीओ शूट करण्यासाठी गायीचा बळी दिला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाजमाध्यमांवर संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर तिघांना अटक करण्यात आली आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत पाहू शकता की, एक सिंहिण गायीची शिकार करत आहे. या प्रसंगाला तिघे आपल्या कॅमेऱ्यात कैद करत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आधिक तपास केला असता धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. आरोपींनी सिंहिणीचा शिकार केल्याचा व्हिडीओ शूट करण्यासाठी गाय जंगलात सोडली होती. सिंहिणीने गायीची शिकार केली. या प्रसंगाचा व्हिडीओ तिघांनी शूट केला. वन विभागानं तिघांनाही अटक केली असून आधिक तपास करत आहेत.


वन विभाग तिन्हीही आरोपींची चौकशी करत आहे. व्हिडीओमध्ये एका तरुणाचा चेहरा दिसत आहे. त्याआधारावर वन आधिकाऱ्यांनी सर्वांना अटक केली आहे. या व्हिडीओत शिकार करतानाचा सिहिंणीचा व्हिडिओ काढताना एक तरुण दिसत आहे. वन विभागाच्या नियमांनुसार, गिर अभयरण्यात प्रवेश करणे आणि शूटिंग करण्यास बंदी आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर वन विभागाच्या नियमांनुसार तिघांवर कारवाई केली जाणार आहे.