23 November 2017

News Flash

Video: प्रपोज करताना २ लाखाची अंगठी नदीच्या पाण्यात पडली

अनोख्या पद्धतीने प्रपोज करण्याचा प्रयत्न चांगलाच महागात पडला

लोकसत्ता ऑनलाइन टीम | Updated: September 13, 2017 6:04 PM

आपल्या आवडत्या व्यक्तीला लग्नासाठी प्रपोज करताना अनेक जण तो क्षण कायम लक्षात राहावा म्हणून काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र कधीतरी हा वेगळा प्रयत्न चांगलाच महागात पडतो. अमेरिकेतील कॅनसस शहरात राहणाऱ्या सेत डिक्सन या तरुणाला त्याची प्रेयसी रूथ सलास हिला अनोख्या पद्धतीने प्रपोज करण्याचा प्रयत्न चांगलाच महागात पडला.

रूथला प्रपोज करण्यासाठी सेतने तिच्यासाठी ३ हजार डॉलरची (अंदाजे २ लाख रुपयांची) हिऱ्याची अंगठी घेतली. त्याने एका बागेतील नदीवरील पुलावर आपल्या प्रेयसीला प्रपोज करण्याचे ठरवले. सर्व काही व्यवस्थित जुळून आले. मात्र जेव्हा तिला अंगठी घालण्याची वेळ आली तेव्हा असे काही झाले जे कोणाच्याच ध्यानीमनी नव्हते. सेतने जेव्हा अंगठीचा बॉक्स उघडला तेव्हा तो त्याच्या हातातून निसटून पुलावर पडला आणि लाकडाच्या फळ्यांनी बनवलेल्या पुलावरून ती अंगठी नदीत पडली.

पाहा या घटनेचा डेली मेलने ट्विटवर शेअर केलेला व्हिडीओ

‘डेली मेल’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा हा प्रकार त्या दोघांच्या मित्रांना समजला, तेव्हा तब्बल १५ जणांनी त्या नदीमध्ये अंगठी शोधण्यासाठी उड्या घेतल्या. मात्र अनेक तास प्रयत्न करुनही कोणालाच ती हरवलेली अंगठी सापडली नाही. उबरमध्ये काम करणाऱ्या सेतचे गेल्या ४ वर्षापासून रुथसोबत प्रेमसंबंध आहेत. त्याचे प्रपोजल संस्मरणीय ठरले, मात्र त्याला खूप मोठा आर्थिक फटकाही बसला.

First Published on September 13, 2017 5:18 pm

Web Title: video usa man from kansas city drops 3g diamond ring into pond during proposal