04 December 2020

News Flash

कहर…! दसऱ्याआधीच रावण अ‍ॅम्ब्युलन्सवर झाला आडवा

पाहा व्हायरल व्हिडीओ

भारतामध्ये दसऱ्याच्या सणाला विशेष महत्व आहे. एक दिवस आधीपासूनच देशभरात दसऱ्याची तयारी सुरु असते. रविवारी दसरा असल्यामुळे रावण दहनासाठी देशभरात तयारी सुरु आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीमुळे सर्व काळजी घेत सण उत्साहात साजरा केला जाणार आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर रावणाच्या पुतळ्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये दसऱ्याआधी रावण अ‍ॅम्ब्युलन्सवर जाताना दिसत आहे.

व्हिडीओ IFS ऑफिसर सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना सुशांत नंदा यांनी, अ‍ॅम्ब्युलन्सवर बसून रावणही कोव्हिड-19 रुग्णालयात जात आहे, असे कॅप्शन दिले आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर, काही लोकांना 2020मध्ये आता हेच शिल्लक होतं अशी प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 2:55 pm

Web Title: video viral raavan travelling on ambulance nck 90
Next Stories
1 ‘लगता है आप को बिहारवाला भैक्सीन घोंपना पड़ेगा..’; मित्राचा संदर्भ देत ट्रम्प यांना ओपन लेटर
2 Viral Photo: दुर्गामातेच्या पायाखाली आसूराऐवजी चिनी राष्ट्राध्यक्षांचं मुंडकं
3 IPL 2020 : ‘तो’ फोटो पाहून विराटला झाली शाळेची आठवण, चहल-राशिद खानचेही भन्नाट रिप्लाय
Just Now!
X